मावळे चक्क या मंदिरात लपत | Rameshwar Mandir | Girye | Vijaydurg | रामेश्वर मंदिर | RoadWheel Rane
RoadWheel Rane RoadWheel Rane
112K subscribers
227,666 views
2.5K

 Published On Apr 24, 2021

साधारण १६ व्या शतकात बांधण्यात आलेलं गिर्ये, विजयदुर्गमधील हे रामेश्वर मंदिर स्थापत्यकलेचा अजोड नमुना आहे. या मंदिरातील भिंतींवर रामायण, महाभारतासारख्या महाग्रंथातील रेखाटलेली भित्तिचित्रे या मंदिराला इतरांपेक्षा वेगळं करतात. तुळाजी तसेच संभाजी आंग्रेंपासून पुढे आनंदराव धुळूपांपर्यंत या मंदिराने वेगवेगळी स्थित्यंतरं पहिली आहेत. पेशवेकालीन पोर्तुगीज घंटा देखील याठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तसेच तत्कालीन काळातील संस्कृती, मानकरी, त्यांची ओळख करून देण्याची पद्धत असं बरंच काही या व्हिडिओत पाहता येईल.

सरखेल कान्होजी आंग्रे यांनी बारीक कोरीव दगडांनी बनविलेले आतील चतुर्भुज मंदिर (भगवान शिवच्या पिंडीच्या मूळ जागेभोवती गाभारा) बांधले. नंतर, मध्यभागी सरदार संभाजी आंग्रे आणि संखोजी आंग्रे यांनी गाभाऱ्यासमोरील मंडप बांधला. या मंडपात चार लाकडी खांब आहेत व त्या सर्वांनी सुंदर कोरीव काम केलेले आहे. त्यांनी गभाराभोवती प्रदक्षिणा मार्गही बांधला.
पेशव्यांनी नियुक्त केलेले सुभेदार गंगाधर भानू यांनी लाकडी खांबांवर कोरीव काम केलेला १४ खांबांचा एक विशाल सभा मंडप तयार करून घेतला.
सरखेल आनंदराव धुळूप यांनी मंदिराच्या उत्तरेकडील आणि पूर्वेकडील बाजूला दोन अतिरिक्त दरवाजे बांधले. पूर्वेकडील बाजूने मंदिराला लागून एक लहान कातळ टेकडी कापून घाटीही तयार करून घेतली.
-------------
Instagram : roadwheelrane
Twitter : RWRane
-------------
Set-up:
GoPro Hero 8 Black : https://amzn.to/3ehYZzl​
Secondory DSLR Camera (Canon EOS 1500D) : https://amzn.to/3tytJ5Q​
Primary DSLR Camera : (Canon EOS 200D II) https://amzn.to/3n0jh4s​
-------------
Credit
bensound.com
Mixkit.com
Sound Effects:
zapsplat.com
--------------
Join this channel to get access to perks:
   / @roadwheelrane  

show more

Share/Embed