आमच्या गावातील घरगुती गणेश व गौरी विसर्जन | ganesh visarjan vlog PART 1
Tp VLOG'S Tp VLOG'S
809 subscribers
570 views
113

 Published On Sep 22, 2024

आमच्या गावामध्ये घरगुती गणेश व गौरी विसर्जन मधील काही निवडक क्षण यामध्ये आहेत.

गणेश उत्सव हा संपूर्ण जगामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणेशोत्सवामध्ये आपण बघतोय की शहराकडे गेलेले आपले नातेवाईक आपल्या गावाकडे परत येतात आणि हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. आपल्या सर्वांना माहीत आहे की गणपती बाप्पा 64 कलांचे अधिपती म्हणून ओळखले जातात. हेच गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरामध्ये पाच दिवसासाठी येतात आणि मंडपामध्ये 11 दिवसासाठी येतात त्यावेळेस आपला परिवार आपला कुटुंब सगळे एकत्र येतो आणि एक क्षण महत्त्वाचे असतात. तसंच गणेश विसर्जन होताना आपल्या डोळ्यांमध्ये आपल्या मनामध्ये एक निराशा असते की गणपती बाप्पा आपल्याला आता सोडून जाणार आणि पुढच्या वर्षी त्या ठिकाणी येणार त्यामुळे आपल्याला हे पाच दिवस महत्त्वाचे असतात एक क्षण जोडणारे असतात मी पाच दिवसांमध्ये झालेले आमच्या गावामध्ये काही गोष्टी घेण्याचा प्रयत्न करत होतो पण वेळ अभावी कामा आभावी ते जमलं नाही पण विसर्जनाच्या दिवशी मात्र मी पूर्ण हा व्हिडिओ केलेला आहे. आपण सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघावा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.

show more

Share/Embed