हुमणी किडीचे नियंत्रण
Agrowone.com.Marathi Agrowone.com.Marathi
379K subscribers
24,083 views
426

 Published On Sep 15, 2019

हुमणी किडीचे नियंत्रण खरीप हंगामामध्ये हुमणी या किडीमुळे भुईमूग, ज्वारी, बाजरी, मका व ऊस यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे टाळण्यासाठी किडीचा जीवनक्रम जाणून प्रौढ व अळी अवस्थांचा नाश सामुदायिकरीत्या करणे आवश्‍यक आहे. कमी पाऊस झाल्याने ऊस पिकात हुमणी अळीचे भुुंग्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. प्रौढ भुंगे ऊस पिकात व रिकाम्या जागेत अंडी घालून हुमणी अळीची निर्मिती होत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच नियंत्रणाचे उपाय करून अळीचा प्रादुर्भाव नियंत्रित करणे आवश्यक आहे.#हुमणी
जून महिन्याच्या दुस-या आठवड्यात जन्मलेली अळी ऊस व इतर संवर्ग पिके (ज्वारी, बाजरी, मका इ.) खाऊन एकाच वेळी मोठ्या प्रमाणात नुकसान करते. नुकसानीचे गांभीर्य आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात शेतक-यांच्या लक्षात येते. तोपर्यंत मोठे नुकसान झालेले असते. अशा वेळी हुमणी अळीचा प्रादुर्भाव होण्याअधीच जून महिन्यातच हुमणी अळीचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. #ॲग्रोवन , #हुमणी कीड नियंत्रण*.*DOWNLOAD APP --- https://play.google.com/store/apps/de...
WHATSAPP https://wa.me/919172800247
VISIT OUR WEBSITE https://agrowone.in/
📞📞 https://wa.me/919172800247

आज जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात हुमणी किडीने धुमाकूळ घातला आहे.. वातावरणात जसे जसे बदल होत आहेत तसे तसे हि कीड स्वतःच्या जीवनक्रमात बदल करत आहे.. 2 वर्षा पूर्वी मे महिन्यात उन्हाळी पाऊस झाला कि भुंगे बाहेर पडत असत.. पण सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर काही भागात पाऊस पडलेला नसताना देखील मे महिन्यात भुंगे बाहेर पडत होते..भुईमूग, सोयाबीन, ऊस, भात प्रत्येक पिकात या किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे.. शेतकरी बंधू वारेमाप किटकनाशक वापरून सुद्धा या किडीवर नियंत्रण मिळवू शकलेले नाहीत..फक्त किटकनाशक हा एकच पर्याय वापरून या किडीचे नियंत्रण कदापि शक्य नाही या साठी एकात्मिक नियंत्रण हाच एक सोपा उपाय आहे ऑनलाइन भेट द्या -------------------------------------------------------
📱मोबाईल ॲप्लिकेशन https://play.google.com/store/apps/de...
🌐 वेबसाइट - https://www.agrowone.com
👍 फेसबुक -   / agrowone  
📸 इंस्टाग्राम -   / agrowone  
 ट्विटर -   / agrowone  
टेलेग्राम - https://t.me/Agrowone
------------------------------------------------------- #ॲग्रोवन #Agrowone

show more

Share/Embed