Ghevda Batatyachi Bhaji | Flat Beens Sabji | सोप्या पद्धतीने बनवता येईल अशी घेवडा बटाट्याची भाजी
Gharcha Swaad Gharcha Swaad
1.27M subscribers
133,162 views
1.7K

 Published On Jan 21, 2018

Ghevda Batatyachi Bhaji | Flat Beens Sabji | सोप्या पद्धतीने बनवता येईल अशी घेवडा बटाट्याची भाजी Easy way to cook Homemade Flat Beens Sabji.

साहित्य | Ingredients - ५०० ग्रॅम घेवडा तुकडे केलेला, २ टोमॅटो मध्यम काप केलेले, २ बटाटी मध्यम काप केलेली, २ बारीक चिरलेले, ३ tbl spn ओल्या नारळाचा खीस, १/२ tbl spn जिरे, १/२ tbl spn राई, २ tbl spn घरगुती लाल मसाला, १ १/२ tea spn घरगुती गरम मसाला, चिमूटभर हिंग, १ tea spn हळद, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ७-८ कडीपत्त्याची पाने, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, ५ tbl spn तेल आणि चवीनुसार मीठ.

कृती | Method - कढईत तेल गरम करून त्यात राई आणि जीरे टाकावे, राई जीरे तडतडायला लागल्यावर त्यात काडीपट्टयाची पाने, हिंग आणि बारीक चिरलेल्या मिरच्या टाकून फोडणी तयार करावी. फोडणी तयार झाल्यावर त्यात कांदा टाकावा आणि तांबूस रंगापर्यंत परतून घ्यावा. कांदा परतून झाल्यानंतर त्यात घरगुती लाल मसाला आणि हळद टाकावी. सर्व मिश्रण परतून एकजीव करावे. एकजीव करून झाल्यानंतर यात घेवडा टाकावा ( घेवडा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.) सोबत काप केलेले बटाटे टाकावेत. घेवडा आणि बटाटे मसाल्यात एकजीव करावे. आता यावर झाकण ठेवून वर अर्धा ग्लास पाणी ठेवावे आणि ३ मिनिटे वाफ काढावी. ( वर पाणी ठेवल्याने शक्यतो मिश्रण खाली चिकटत नाही. ) ३ मिनिटानंतर झाकण उघडून सर्व जिन्नस परतून घ्यावे. पुन्हा वर झाकण ठेवून ५ मिनिटे वाफ काढावी. ( झाकणावरचे पाणी कमी झाल्यास पुन्हा पाणी टाकून वाढवावे ) ५ मिनिटानंतर झाकण उघडून बटाटे शिजले आहेत कि नाही ते पाहावे. बटाटा अर्धी शिजू दिसल्यावर त्यात काप केलेले टोम्याटो, ओल्या नारळाचा खीस आणि चवीनुसार मीठ टाकावे, संपूर्ण मिश्रण एकजीव करावे. वर पुन्हा झाकण ठेवून शेवटची ५ मिनिटे वाफ काढावी. ५ मिनिटानंतर मिश्रण परतून गॅस बंद करावा आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर शिंपडावी. आपली घेवडा बटाट्याची भाजी तय्यार !

show more

Share/Embed