ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन १४ जुलै रोजी
Express Line Express Line
982 subscribers
59 views
1

 Published On Jun 26, 2024

ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन १४ जुलै रोजी

- एक रोमांचक आणि पर्यावरणास अनुकुल मॅरेथॉन अनुभव घेता येणार

पुणे, २६ जून २०२४- पुणे स्थित गोल्डलिफ एंन्टरटेन्मेंटच्या वतीने १४ जुलै २०२४ रोजी पहिल्या ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन सदू शिंदे क्रिकेट मैदानावर या ठिकाणी होणार आहे.

ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन स्पर्धेला पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा यांनी प्रायोजित केले असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे सहकार्य लाभले आहे. स्पर्धेला बेलवलकर ग्रुपचा पाठिंबा लाभल्यास असून आणि सस्टेनेबिलिटी पार्टनर इको फॅक्टरी फाऊंडेशन यांचे सहकार्य लाभले आहे.

ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉनचे आयोजक अथर्व अय्यर म्हणाले की, 'अशा प्रकारची ही पहिलीच इको फ्रेंडली मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. यात प्लॅस्टिक आणि कार्बनचा शून्य वापर केला जाणार आहे.'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे (आयएएस), पीएमसी आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, पीसीएमसी आयुक्त शेखर सिंग यांनी या अनोख्या मॅरेथॉन स्पर्धेला भरीव पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही या दोघांचेही आभार मानतो, असेही अय्यर म्हणाले.

यावेळी बेलवलकर ग्रुपचे नील बेलवलकर व नकुल बेलवलकर, दि इको फॅक्टरी फाऊंडेशनचे श्रीयश गुने आदी मान्यवर उपस्थित होते.

या मॅरेथॉनमध्ये २१ कि.मी. धावणे, १० कि.मी. धावणे, ५ कि.मी. धावणे, २ कि.मी. फन रन, आणि ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी अशा विविध शर्यतींचा समावेश करण्यात आला आहे.

'निसर्गाच्या सान्निध्यात धावणे आणि त्याच्या जतनासाठी हातभार लावणे हा वेगळा अनुभव या मॅरेथॉनमधून मिळणार आहे. खेळाच्या माध्यमातून शाश्वततेला चालना देण्यासाठी आणि एका चांगल्या कारणासाठी सर्वांना एकत्र आणण्यासाठी तसेच समाजाला मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,' असे बेलवलकर ग्रुपचे संचालक समीर बेलवलकर यांनी सांगितले.

'ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉनच्या माध्यमातून पर्यावरणाचे महत्व सांगणारा संदेश समाजापर्यंत पोहोचला जाणार आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमातून सामुदायिक सहभागाने अधिकाधिक झाडे लावण्यास मदत होईल,' असे दि इको फॅक्टरी फाऊंडेशनचे संस्थापक आनंद चोरडिया यांनी सांगितले.

पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक प्रविण चोरबेले म्हणाले की, ग्रीन पुणे मान्सू हिल मॅरेथॉन ही केवळ एक शर्यत नाही, तर ती एक निरोगी आणि हरित पुण्यासाठीची एक चळवळ आहे. अशा कारणासाठी समाज एकत्र येत आहे हे पाहून आम्हाला आनंद होत आहे.

प्रत्येक धावपटूला एक रोपटे आणि सीड बॉल दिले जाणार आहे. स्पर्धकांना दिले जाणारे टी शर्ट हे पुनर्निवनीकरण केलेल्या पीईडी बाटल्यांपासून बनवले गेले आहेत. शर्यतीच्या मार्गावर पुनर्वापर केलेले पाणी उपलब्ध केले जाईल. शर्यती दरम्यान स्पर्धकांबरोबर असलेले पायलट देखिल बिगॉसच्या ईव्ही बाईक्स वापरणार आहेत. शर्यत पूर्ण करणाऱ्या प्रत्येकास ज्यूटची बॅग, पदक, नाश्ता, मार्ग सहाय्यक, नॅपकिन, गिफ्ट व्हाऊचर आणि एक ई-प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

यातील २१ कि.मी. अंतराची अर्ध मॅरेथॉन सदू शिंदे क्रिकेट मैदानापासून सुरु होऊन तळजाई डोंगर, पद्मावती पार्किंग, ट्रेझर पार्क मार्गे अरण्येश्वर मंदिर, गजानन महाराज चौक मार्गे सदू शिंदे क्रिकेट मैदानावर संपेल. १० कि.मी. अंतराची शर्यत दोन टप्प्यात आणि ५ कि.मी. शर्यत एका टप्प्यात धावेल.

मुख्य २१ कि.मी. पुरुष आणि महिला गटातील विजेत्याला करंडक आणि रोख ११ हजार रुपये, तर उपविजेत्याला करंडक आणि रोख ७ हजार रुपये, १० कि. मी. शर्यत जिंकणाऱ्याला करंडक आणि ८ हजार रुपये, तर उपिवजेत्याला करंडक आणि रोख ५ हजार रुपये, ५ कि.मी. शर्यत जिंकणाऱ्यास करंडक आणि रोख ६ हजार रुपये, उपविजेत्याला करंडक आणि रोख २ हजार रुपये अशी पारितोषिके दिली जाणार आहेत.

इको फॅक्टरी फाऊंडेशन (सस्टेनेबिलिटी पार्टन), चॅम्पियन स्पोर्टस (स्पोर्टिंग पार्टनर), बाबूज, लक्ष्मीनारायण चिवडा (गिफ्ट पार्टनर), एनर्जल (एनर्जी ड्रिंक पार्टनर), बिगॉस (रुट सपोर्ट पार्टनर), टाऊनस्क्रिप्ट डॉट कॉम (नोंदणी पार्टनर), इस्टिटूट ऑफ स्पोर्ट्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी (स्पोर्ट्स एज्युकेशन पार्टनर) आणि लिंकिन मूव्हज (फिजिओ पार्टनर) हे यांचे सहप्रायोजकत्व लाभले आहे.

ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉनसाठी नावनोंदणी करण्यासाठी https://www.townscript.com/e/pune- monsoon-hill-marathon-111413 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक चौकशीसाठी आयोजकांशी भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल) 9356087318 वर संपर्क साधावा.

show more

Share/Embed