हॅरी पॉटर आणि परिस| CH5 ‘गुप्त बोळ’ |Marathi audio book|
VO Aditi VO Aditi
50 subscribers
30 views
2

 Published On Oct 10, 2024

पुस्तकाचा सारांश:

तो क्विडिच संघाचा हिरो नव्हता, तो जादूच्या केरसुणीवर स्वार होऊन, उडत जाऊन, काही गुण देखील मिळवत नव्हता. त्याला कुठलेही जादूचे मंत्र येत नव्हते, त्यानं कधी अंड्यातून ड्रॅगनचा जन्म झालेला बघितला नव्हता किंवा कधी तो अदृश्य करणारा झगाही बघितला नव्हता. त्यानं तर आपले काका व मावशी - म्हणजेच डर्स्ली पती-पत्नी आणि त्यांचा लठ्ठ, दुष्ट पोरगा डडली यांच्याबरोबर रहात असताना जन्मभर फक्त दु:ख भोगलं होतं.
खोलीच्या नावानं हॅरीसाठी होतं जिन्याखालचं एक कपाट आणि तिथल्या अकरा वर्षांच्या वास्तव्यात कधीच कुणीही त्याचा वाढदिवस साजरा केला नव्हता. पण ज्यावेळी एक प्रचंड माणूस त्याला भेटून त्याच्या नावाचं एक पत्र त्याला देतो त्यावेळी हे सारं चित्र एकदम पालटतं कारण त्या पत्रात हॅरीला एका अशा अविश्वसनीय जागेचं निमंत्रण असतं जे हॅरी आणि त्याची ही कहाणी वाचणाराकुणीही- कधीच विसरू शकणार नाही. कारण तिथे त्याला मित्र भेटतात, हवेत खेळायचे खेळ खेळता येतात, वर्गापासून तर जेवणापर्यंत सर्व वस्तूंमध्ये जादू असते. शिवाय तिथेच त्याला आपलं नाव विख्यात करण्याचीसंधी, ती त्याची वाटत बघत असते पण जर हॅरी त्या लढ्यात जगला वाचला तर !

Disclaimer -
The rights of the book are secured with the author. I am using it for voiceover practice. I do not own any rights to the book.
Images used in the video are from google and the rights of all images secured with the respective owners.
The voice in the video is owned by the artist aditi date.
Music used in the video is copyright free music
#harrypotter #harrypotterfandom #hpworld #audiobooks #marathiaudiobooks #fantacyworld

show more

Share/Embed