साहित्य-कला पुरस्कार 2021 प्रदान सोहळा
Bhavarlal and Kantabai Jain Foundation Bhavarlal and Kantabai Jain Foundation
414 subscribers
157 views
7

 Published On Streamed live on Dec 13, 2022

साहित्य-समाज-संस्कृतीचे आणि पर्यावरणाचेही अनुबंध घट्ट असतात. दर्जेदार साहित्य समाजमनाला आकार देतं, कसदार विचारांची, खोलवर जाणिवांची पेरणी करतं. कलादृष्टीने संपन्न समाजमन विधायक भूमिकांसाठी संवेदनशील असतं. मराठी साहित्यिकांचा तसेच कलाक्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलावंताचा यथायोग्य सन्मान व्हावा यासाठी आपल्या संस्थांच्यावतीने सुरू करण्यात आलेले साहित्य-कला पुरस्कार या समृद्ध परंपरेचा सुंदर भावबंध आहेत. आदरणीय भवरलालजी जैन तथा श्रद्धेय मोठेभाऊ लेखक आणि कृतिशील विचारवंत होते, त्यांनी प्रस्तुत पुरस्कार सोहळ्याचे बीजारोपण केले.

• कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार•
• सर्वोत्कृष्ट लेखिका कवयित्री बहिणाई पुरस्कार•
• सर्वोत्कृष्ट कवी बालकवी ठोमरे पुरस्कार•
• सर्वोत्कृष्ट गद्यलेखन ना. धों. महानोर पुरस्कार•

साहित्य-कला पुरस्कार 2021 प्रदान सोहळा

‘कांताई साहित्य-कला जीवन गौरव पुरस्कार’
श्री. प्रभाकर कोलते, मुंबई

सर्वोत्कृष्ट लेखिका - ‘कवयित्री बहिणाई पुरस्कार’
संध्या नरे-पवार, मुंबई

सर्वोत्कृष्ट कवी - ‘बालकवी ठोमरे पुरस्कार’
श्री. वर्जेश सोलंकी, मुंबई

सर्वोत्कृष्ट गद्य लेखन - ‘ना.धों. महानोर पुरस्कार’
श्री. प्रवीण बांदेकर, सावंतवाडी

•कार्यक्रमाचे अध्यक्ष•
ज्ञानपीठ सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे

•विशेष उपस्थिती•
साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ना.धों. महानोर

•सन्माननीय उपस्थिती•
सेवादास श्री. दलिचंद जैन श्री. अशोक भवरलाल जैन

•निवड समिती सदस्य•
डॉ. शोभा नाईक, डॉ. सिसिलीया कार्व्होलो, प्रा.डॉ. रंगनाथ पठारे, प्रा.डॉ. सदानंद देशमुख, श्री. श्रीकांत देशमुख, श्री. शंभू पाटील

show more

Share/Embed