ज्वारीची चुरचुरीत भाजकी | Jowar Bhajki Thalipeeth | चविष्ट, घरच्या साहित्यात होणारी भाजकी | Healthy
Sugran Seema Sugran Seema
9.09K subscribers
2,728 views
60

 Published On Sep 21, 2024

साहित्य:

२मोठे कांदे. ऊभे चिरलेले
१चमचा. आलं लसूण भरड
१/२ चमचा. मिठ
१/२चमचा. हळद
१चमचा. लाल तिखट
१/२ चमचा. तिळ
१ चमचा. धणा पावडर
१/४ चमचा. आमचूर
१/२ चमचा. साखर
१ वाटी. ज्वारीचं पीठ
२ चमचे. तांदूळ पीठ
२चमचे. बेसन
२चमचे. कोथिंबीर

कृती:

प्रथम परातीत चिरलेला कांदा घाला.त्यात २चमचे तांदूळ पीठ,२चमचे बेसन ,आलं लसूण भरड,मीठ,हळद, लाल तिखट, तीळ,धणा पावडर, आमचूर पावडर, साखर, २चमचे कोथिंबीर आणि १ वाटी ज्वारीचं पीठ घालून मिक्स करा आणि थोडं थोडं पाणी घालून मध्यम पीठ मळा. १० मिनिटं झाकून ठेवा. पोलपाटावर पाणी लावा. एक ओला रूमाल पोळपाटावर पसरा . त्यावर पीठाचा मध्यम गोळा घेऊन पाण्याच्या सहाय्याने तो पातळ पसरा.गॅसवर तवा तापला की, रूमालासहीत भाजकं तव्यावर टाका आणि रुमाल हळूच काढून घ्या. कडेने तेल सोडून भाजकं दोन्ही बाजूंनी चुरचुरीत भाजून घ्या.लोण्याच्या गोळ्यासोबत गरमागरम भाजकी सर्व्ह करा.

-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.

मोबाईल OnePlus Nord CE 3 5G: https://amzn.to/3WwESUc
माइक Boya BY-V10 2.4 ghz: https://amzn.to/3SHjHxY
लॅपटॉप Lenovo IdeaPad Slim 3: https://amzn.to/4fGcJ6e
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport: https://amzn.to/4ddHGwU

#चुरचुरीत #भाजलेली #थालिपीठ #व्हायरल #milet #jowardosa #jowarroti #viralvideo #ज्वारी #indianfood #खमंग #न्याहारी #पौश्टीक #महाराष्ट्रीयन #मराठी #जुनीरेसिपी #tawafry #भाजकी#thalipith #ब्राम्हणीपद्धत #पोटभरू #roti #besanroti

show more

Share/Embed