महाराजांनी तळकोकणात वास्तव्य केलेला "मनोहरगड"|Monsoon Trek To Manohargad
Konkani Ranmanus Konkani Ranmanus
482K subscribers
51,504 views
3K

 Published On Jun 11, 2021

मनोहर मनसंतोष गड..!

कोकणातील मालवण, वेंगुर्ला, रेडी इत्यादी बंदरात उतरणारा माल विविध घटनामार्गानी घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जात असे. यापैकी आंबोली घाटावर व कुडाळ वरून घाटावर जाणाऱ्या हणमंत घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मनोहर- मनसंतोष गड हे किल्ले बांधण्यात आले. मनोहर-मनसंतोष गड हे जोड किल्ले त्यावरील अवशेषांसह आजही दिमाखाने उभे आहेत. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे या किल्ल्यावर 1 महिना वास्तव्य होते.

इतिहास
हा किल्ला कोणी व केंव्हा बांधला हे ज्ञात नाही, पण गडाच्या बांधणी वरून या गडाची डागडूजी / फेररचना शिवाजी महाराजांनी केली असावी. आग्र्याहून सुटका झाल्यावर शिवाजी महाराज राजगडावर पोहोचले. तेथून रांगणा गडाला घातलेला वेढा उठवण्यासाठी महाराज ११ एप्रिल १६६७ ला या भागात दाखल झाले. रांगण्याचा वेढा उठवून १३ मे १६६७ रोजी महाराज मनोहर गडावर गेले. तेथे त्यांनी १५ जून १६६७ पर्यंत म्हणजे तब्बल ३४ दिवस मुक्काम केला.

पुढील काळात मनोहर- मनसंतोष गडाचा ताबा कोल्हापूरच्या छत्रपतींकडे गेला.१८३४ मध्ये गडावर गडकर्‍यांनी बंड केले, ते मोडण्यासाठी छत्रपतींनी आपल्या सरदारांना पाठविले , त्यांनी बंडाचा बिमोड केला, पण पुढील काळात बंड वारंवार होऊ लागल्यामुळे, बंड मोडून काढण्यासाठी छ.शहाजी महाराज (बुवा महाराज) स्वत: १९३६ साली गडावर चालून आले, त्यांनी गडकर्‍याला अटक करून गडावरील २ तोफा नेल्याची नोंद आहे. १८३८ मध्ये छ.शहाजी महाराज (बुवा महाराज) यांच्या निधना नंतर गडावर गडकर्‍यांनी पुन्हा बंड केले, ते मोडण्यासाठी छत्रपतींनी आपल्या सरदारांना पाठविले , त्यांनी बंडाचा बिमोड केला व बंडकर्‍यांना अभय दिले.

इ.स. १८४४ मध्ये इंग्रजां विरुध्द झालेल्या बंडात मनोहर- मनसंतोष गडाने इंग्रजांना जेरीस आणले. या बंडाचा सुत्रधार फोंड सावंत तांबूळकर याने सावंतवाडी संस्थानाचे युवराज अनासाहेब यांना सावंतवाडीच्या राजवाड्यातून पळवून मनोहर गडावर आणून ठेवले व त्यांच्या नावाने आजूबाजूच्या परीसरात

वसूली केली. त्याचप्रमाणे बंडवाल्यांनी मनोहर गडाच्या परीसरात स्वत:चा दारूगोळा बनविण्याचा कारखाना सूरु केला. त्यात तयार होणारा माल सामानगड, रांगणा इत्यादी किल्ल्यांवर इंग्रजां विरुध्द लढण्यासाठी पाठविण्यात आला. या सर्व घटनांमुळे इंग्रजांनी जनरल डेला मोंटी व कर्नल औट्राम यांना मनोहर गडावरील बंडाचा बिमोड करण्यासाठी पाठविले. त्यांनी केलेल्या कुलपी गोळ्यांच्या मार्‍यात गडाच्या तटबंदीला भगदाड पडले. २६ जानेवारी १८४५ रोजी बंडकरी गड सोडून पळून गेले. इंग्रजांनी मनोहर- मनसंतोष गडाच्या पायर्‍या उध्वस्त केल्या.

connect us on
Iɴꜱᴛᴀɢʀᴀᴍ:   / konkaniranmanus  
Yᴏᴜᴛᴜʙᴇ:
   / konkaniranmanus  

#manohargad #konkaniranmanus #ecotourism

show more

Share/Embed