फ्लॅटचा ताबा घेण्याची योग्य पद्धत
Ravi Karandeekar Ravi Karandeekar
17.4K subscribers
5,722 views
152

 Published On Mar 9, 2020

या व्हिडीओमध्ये संजीवनी डेव्हलपर्सचे (www.sanjeevanideve.com) श्री. संजय देशपांडे त्यांच्याकडच्या फ्लॅटचे पझेशन देण्याच्या पद्धती विषयी माहिती सांगत आहेत. मी त्यांच्या बऱ्याच प्रोजेक्टसच्या पझेशन - हॅन्डओव्हर - समारंभांना उपस्थित राहिलो आहे आणि त्याबद्दल ब्लॉगही लिहिले आहेत. त्यामुळे जेंव्हा मी “गुड प्रॅक्टिसेस इन पुणे रियल इस्टेट मार्केट” या विषयावर व्हिडीओ सिरीज करायचे ठरवले तेंव्हा पहिल्यांदा मी संजय देशपांड्यांशी त्यांच्या पझेशन देण्याच्या पद्धती विषयी बोललो. त्यांची फ्लॅटचे पझेशन देण्याची जी पद्धत आहे ती बिल्डर आणि घर घेणारे - पझेशन देणारे आणि घेणारे- दोघांनाही सुखाची आहे. घर घेण्याच्या व्यवहारातील टेन्शन - भय - ताण तणाव - कमी करायचा असेल तर आपण या चांगल्या पद्धतींचा आग्रह धरला पाहिजे असे मला वाटते. घर घेण्याच्या व्यवहारातील सर्व टप्यात ज्या ज्या चांगल्या पद्धती आहेत त्यांची ओळख तुम्हाला पुढच्या व्हिडिओत करून देणार आहे. तर हा व्हिडीओ बघा. तुमच्या सूचना - कल्पना - कॉमेंटमध्ये लिहा. माझ्या चॅनलला सबस्क्रिब करून घंटा वाजवा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडीओ बघण्यासाठी निमंत्रण येईल.

पझेशन विषयी जर तुम्हाला काही बोलायचे असेल तर श्री. संजय देशपांड्याना या पत्यावर तुम्ही लिहू शकता - [email protected]

माझ्याशी बोलायचे असेल तर 9860044110 या नंबरवर सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत केंव्हाही फोन करू शकता.

#FlatPossessionCheklist #FlatInspectionBeforePossession #GoodPracticesInPuneRealEstateMarket

show more

Share/Embed