शिवरायांनी जिंकलेला पहिला किल्ला | तोरणा किल्ला | Torna killa | Torna fort | Trek | Pune | 4K Video
Swapnil Narsude Vlogs Swapnil Narsude Vlogs
1.21K subscribers
2,592 views
168

 Published On Nov 6, 2021

नमस्कार मित्रांनो,
छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला म्हणजेच तोरणा किल्ला आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
तोरणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील डोंगरी किल्ला आहे.

उंची १४०३ मीटर/४६०४ फूट

ठिकाण :- वेल्हे तालुका, पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत

जवळचे गाव :- वेल्हे

स्थापना :- १४७० ते १४८६

पुणे जिल्ह्यातील वेल्हे हे तालुक्याचे गाव तोरणाच्या पायथ्याशी आहे. पुणे-वेल्हे अंतर ६० कि.मी आहे. पुणे-नसरापूर-वेल्हे, पुणे-पानशेत-वेल्हे व पुणे-खानापूर-पाबे मार्गे वेल्हे अशा मार्गांनी तोरणा गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. शिवाजी महाराजांच्या काळातील वेल्हे-वेग्रे आळीमार्गे पाऊलवाटेने दीड-दोन तासात बिनी दरवाजातून तोरण्यावर जाता येते. हा मार्ग इतर मार्गांपेक्षा सोपा आहे. अवघड ठिकाणी पुरातत्त्व खात्याने लोखंडी संरक्षक कठडे बसवले आहेत. त्यामुळे सहज चढउतार करता येते. दुसरा मार्ग वेल्ह्यापासून ५ कि.मी अंतरावर असलेल्या भट्टी या गावातून आहे. गावाच्या पश्चिमेकडून वाळणजाई दरवाजातून बुधला माचीवर थेट वाट जाते. या वहिवाटीच्या वाटांशिवाय चोरवाटेने येणारे अन्य मार्ग अडचणीचे आणि धोकादायक बनले आहेत. वेल्हे गावातून चढताना दिसणारा तोरणा आणि गुंजवण्याकडून दिसणारा राजगड यात बरेच साम्य आहे.
तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, त्यापैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात. पुण्याच्या नैर्ऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये १८.२७६ उत्तर अक्षांश व ७३.६१३ पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. या गडाच्या दक्षिणेला वेळवंडी नदी असून उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. या गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत. पुण्यापासून रस्त्याने तोरण्यापर्यंतचे अंतर ६० कि.मी. आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इ.स. १६४७ मध्ये अगदी पहिलाच घेतलेला हा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला[१] असे ठेवण्यात आले.[२] महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव बदलून 'प्रचंडगड' असे ठेवले. या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला.[३]
हा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरून हा शैवपंथाचा आश्रम असावा. इ. स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो शिवाजी महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या. महाराजांनी आग्ऱ्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांची निर्घृण हत्या झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ. स. १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला होता. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय. तोरणा गडावर मेंगाई देवीचे प्राचीन मंदिर आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
toma fort
torna fort trek
torna fort making
torna fort history in marathi
torna fort pune
torna fort drawing
torna fort horror story
torna fort drone
torna fort information in english torna fort status
torna fort trek in monsoon torna fort diwali
torna fort jeevan kadam
torna fort history
torma fort history in hindi
torna killa chi mahiti
torna killa shivaji maharaj episode torna killa making
torna killa kasa banvaycha torna killa vishe mahiti
torna killa diwali
torna killa kaise banaye torna killa kasa karaycha
torna killa photo torna killa map
torna killa dakhva
torna killa video
torna killa nibandh torna killa vishay mahiti
torna killa
torna fort
torna killa chi mahiti
torna a casa
torna fort trek
torna a casa lvrics
torna killa kasa banvaycha
torna casa maneskin
torna fort making
torna fort history in marathi
torna killa vishe mahiti
torna a casa lyrics english
torna fort pune
torna killa making
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
MY Second Channel Name ;- Swapnil Narsude

MY Second Channel Link ;-    / @punerikida7897  

Apne Bhai KO Follow Karna :-Instagram : instagram.com/sn_marathi_vlogs

SN Marathi Vlogs
From - Pune ,Maharashtra { India }

Don`t Forget To Like , Comment , Share & Subscribe
------------------------------------------------------------------------------------------------------
#torna_fort #tornakilla #sn_marathi_vlogs #torna_fort_pune

show more

Share/Embed