व्हेज पोहा कटलेट / Crispy Veg poha Cutlet/Poha Cutlet Recipe
Siddhi food recipes Siddhi food recipes
300 subscribers
224 views
6

 Published On Sep 13, 2024

व्हेज पोहा कटलेट / Crispy Veg poha Cutlet/Poha Cutlet Recipe




कृती :-

व्हेज पोहा कटलेट बनवण्यासाठी एक वाटी भिजवलेले पोहे घ्यावे त्यामध्ये दोन उकडलेले बटाटे हाताने कुस्करून घालावे, एक छोटा गाजर किसून घालावा, एक शिमला मिरची बारीक चिरून घालावी, अर्धा इंच आला किसून घालावा, थोडी कोथिंबीर घालावी एक चमचा लाल तिखट व हळद घालावी एक चमचा धनापूड घालावी, एक चमचा गरम मसाला घालावा, अर्धा चमचा चिली फ्लेक्स व ऑरेगॅनो घालावे, एक चमचा सफेद तीळ घालावे व चवीनुसार मीठ घालावे हे सर्व मिश्रण हाताने मिक्स करून घ्यावे व त्याचे चपट्या आकाराचे कटलेट बनवून घ्यावे एका डिशमध्ये दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यामध्ये पाणी मिक्स करून घ्यावे पातळ पेस्ट तयार करावी कटलेट कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यामध्ये डीप करून बुडवून वरून त्यांना ब्रेडक्रम्स लावून घ्यावा,
गॅसवर एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करून घ्यावे त्यामध्ये ब्रेड क्रम्स लावलेले कटलेट घालावे व दोन्ही बाजूने कुरकुरीत भाजून घ्यावे कटलेट शॅलो फ्राय करावे व खाण्यासाठी सॉस बरोबर सर्व्ह करावे.

आपले व्हेज पोहा कटलेट तयार आहेत.

show more

Share/Embed