उदयराज तोरणे यांनी वाहिनी श्रद्धांजली,११ जुलै १९९७,माता रमाबाई आंबेडकर नगरातील एक भयाण
V STUDIO MUMBAI V STUDIO MUMBAI
4.05K subscribers
130 views
1

 Published On Sep 7, 2024

उदयराज तोरणे यांनी वाहिनी श्रद्धांजली,११ जुलै १९९७,माता रमाबाई आंबेडकर नगरातील एक भयाण,ऐतिहासिक दिवसाला आज २७ वर्ष झाली,प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना,जनतेचा झालेला उद्रेक,त्यानंतर पोलीसांनी केलेला गोळीबार,गोळीबारात वसाहतिमधील १० भिमसैनिक मरण पावले व १२ जण जखमी झाले,त्यानंतर पोलीसांच्या दहशतीला न जुमानता मी व माझ्या सहका-यांनी,गोळीबारात शहिद झालेले संजय निकम, मंगेश शिवशरण,बबलू वर्मा,अनिल गरूड या शहिदांना एक एक करून उचलून आणून राजावाडी रूग्णालयात पाठवत होतो,आणि गोळीबारात जखमी झालेल्या हिरामण गायकवाड,सुदेवी गीरी,नामदेव सुरवाडे,विजय गायकवाड इत्यादी जखमी यांना रिपब्लिकन नेते दिवंगत दिवंगत सुधाकर जाधव यांनी गाडी आणली,आणि तरूण मित्र मंडळाचे कार्यकर्ते मा.विलास निरभवणे यांनी आणलेली टॅक्सी या दोन गाड्यांमधे या सर्व शहिदांना व जखमींना एक एक करून घेऊन येत होतो,व राजावडी रुग्णालयात दाखल करत होतो,डी.बी. पवार चौक परीसरातील सर्व शहिद झालेल्यांना व जखमींना रुग्णालयात नेल्या नंतर शेवटी हायवेरोड नजीक असलेला कौशल्याबाई पाठारेचा मृतदेह उचलायला गेल्यानंतर,पोलीसांनी मनाई केली व आमच्यावर बंदूका रोखल्या,या घडामोडीत त्यावेळी माझ्या सोबत असलेल्या केदारे मावशी ( लाला केदारेची आई ) , पंडीत उशीरे काका ( सिद्धार्थ उशिरेचे वडील ) आणि सोबतीच्या अनेक महिलांनी व मुलांनी मला थांबवले व आम्ही परत चौकात आलो व सर्वजण राजावाडी रुग्णालयात गेलो,गोळीबारात शहिद झालेल्या भिमसैनिकांच्या मृतदेहाचे पंचनामा करताना वसाहतीमधील डॉ. हरीष आहिरे यांना मदत केली यामधे सर्व दिवस गेला त्यानंतर गोळीबाराचा आदेश देणारा फौजदार मनोहर कदम व पोलीस प्रशासनाविरोधात रिपब्लिकन नेते मा. शामदादा गायकवाड आणि वसाहतिमधील प्रमुख कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात एक प्रदिर्घ न्यायलयीन लढाई लढली गेली यामधे दिवंगत भास्कर बर्वे व डॉ . हरीष आहिरे आणि चिंतामण गांगुर्डे यांनी वसाहतीच नेतृत्व केले यामधे अनेक कार्यकर्ते हिरीरीने सहभागी झाले होते विस्तार भयास्तव नावे लिहीत नाही,या नंतर २००५ साली गृहमंत्र्याच्या आदेशाने वसाहतिमधील कार्यकर्त्यांवर ३ केसेस लादल्या गेल्या त्यामधे १) पुतळा विटंबना
२) दंगल घडविणे ३ ) सरकार उलथवण्याच कट कारस्थान अशा तीन केसेस लादल्या या केस मधे तानसेनभाई ननावरे , दयानंद मस्के , डॉ. हरीष आहिरे , चिंतामणभाई गांगुर्डे , रजनीताई आहिरे , दिवंगत लताताई सकट दिवंगत देविदास करमकर , दिवंगत अरूण कांबळे , राजा गांगुर्डे , मंगेश पगारे , कैलास बर्वे व शशिकांत बर्वे आणि विकास पवार इत्यादी कार्यकर्ते या केस मधे होते,बरीच वर्षे झाली त्यामुळे सगळीच नावे आठवत नाही,सरकारने केसेस मागे घेतल्या पण पुतळा विटंबनेची केस लढायचीच हा निर्णय सर्वांनी घेतला आम्ही सर्वांनी ती केस लढून जिंकली व मा. न्यायालयाने आमची सर्वांची निर्दोष मुक्तता केली
मधल्या काळात पोलीस बंदोबस्तात असलेल्या मनोहर कदमला कोर्टात तारखेला आल्यावर बेदम मारायच अस विकास पवार आणि मा. विलास रुपवते यांनी ठरवून वसाहतिमधील सर्व तरूण कार्यकर्त्यांना घेऊन हायकोर्टात धडक मारली होती पण बातमी "लीक " झाल्यामुळे मला व विलास रुपवते यांना पोलीसांनी हायकोर्टाच्या गेटवरच पकडल,तिथून थेट पंतनगर पेलीस ठाण्यात आणून आमचा जबाब घेऊन कायदेशीर नोटीस दिली की मनोहर कदमच काही बरं-वाईट झाल तर आम्हा दोघांना जबाबदार धरण्यात येईल अस लिहून घेतल आणि संध्याकाळी सोडलं,११ जुलै १९९७ आज या घटनेला २७ वर्षे झाली सगळा घटनाक्रम आठवला,१) पुतळा विटंबनेचा विषय आता संपलाय,२) मनोहर कदमला शिक्षा तर झाली पण सध्या तो जामिनावर निवांत जगतोय,माता रमाबाई आंबेडकर नगर शांत झालय आणि शहिद भिमसैनिकांना विनम्र अभिवादन !आता एवढच उरलय ... अभिवादक :- विकास पवार
महाराष्ट्रातील उभरत्या कवींनी लिहिलेली गाणी व उभरत्या गायकांनी गायलेली गाणी तसेच महाराष्ट्रातील जुनेजाणते कवी व सुप्रसिद्ध गायकांनी गायलेली गाणी ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी आपल्या हक्काचे युट्युब चैनल विश्वास डी गायकवाड हे युट्युब चैनल सबस्क्राईब करा आणि रोज महाराष्ट्रातील हजारो कलाकारांनी गायलेली गाणी बघा सर्व कलाकारांचा आवडता एकमेव युट्युब चैनल विश्वास डी गायकवाड,vishwas D gaikwad,आणि,वि स्टुडिओ मुंब,Vishwas Janatecha

show more

Share/Embed