चिपळूण शहरात तुतारी घुमली, घड्याळाची धक धक वाढली
real news marathi real news marathi
443 subscribers
2,057 views
29

 Published On Sep 22, 2024

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उद्या चिपळूणमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. खरंतर चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र पक्ष फुटी नंतर विद्यमान आमदार शेखर निकम अजित पवारांसोबत गेले. त्यामुळे आपला गड राखण्याचे आव्हान शरद पवारांसमोर निर्माण झाले आहे. यासाठी चिपळूण येथील यशस्वी उद्योजक प्रशांत यादव या पठ्ठ्याला तयार करण्यात आलेय. तशी घोषणा उद्या पक्षाध्यक्ष शरद पवार सभेमध्ये करण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे शरद पवारांच्या सभेच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. चिपळूण शहरातून निघालेल्या या रॅलीमध्ये बाईक आणि रिक्षांमध्ये स्वार होऊन कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या रॅलीच्या निमित्ताने चिपळूणकरांना तुतारीचे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले. तर दुसरीकडे तुतारीच्या शक्ती प्रदर्शना मुळे घड्याळाचे मात्र टेन्शन वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

show more

Share/Embed