किल्ले भूषणगड || सातारा जिल्ह्यातील सुंदर असा किल्ला ||Fort
Powerrpritam Powerrpritam
473 subscribers
191 views
38

 Published On Sep 28, 2024

भूषणगड (Bhushangad) किल्ल्याची ऊंची : 2970
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सातारा
श्रेणी : मध्यम
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात दूरवर पसरलेल्या मैदानी प्रदेशात भूषणगडचा एकमेव डोंगर आपले दुरुनच लक्ष वेधून घेतो. या डोंगरावर सुस्थितीत असलेला भूषणगडचा किल्ला व नवसाला पावणारी हरणाइ देवी, या मुलुखात प्रसिध्द आहे. गावकर्‍यांनी गडाला पायर्‍या बांधल्या आहेत व गडावर वृक्षारोपण करुन गड हिरवागार केलेला आहे. यात पिवळ्याजर्द फुलांची झाडे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गडाला वेगळीच शोभा आली आहे. तसेच अनेक छोटे पक्षी व फुलपाखर यांनी गड गजबजून गेला आहे.

⚫️पोहोचण्याच्या वाटा :-
भूषणगड सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात येतो. दहीवडी - कराड मार्गावरील वडूज या मोठ्या गावातून भूषणगडला जाण्यासाठी बसेस आहेत. खाजगी वाहानाने भूषणगडला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत.

१) पुणे - फलटणमार्गे - भुषणगडला जाण्यासाठी :

अ) दहीवडी - कराड मार्गावर वडूज पासून २० किमी अंतरावर पुसेसावळी गाव आहे. या गावात शिरल्यावर उजव्याबाजूला जाणारा रस्ता भूषणगडच्या पायथ्याशी जातो. या ५ किमी रस्त्यापैकी अर्धा रस्ता कच्चा आहे.

आ) दहीवडी - वडूज - उंबर्डेफाटा - शिरसेवाडी - होळीचेगाव - भूषणगड हा छोट्या गावांमधून जाणारा रस्ता खराब आहे. तसेच चुकण्याची शक्ययता जास्त आहे

२) पुणे - सातारा मार्गे भुषणगडला जाण्यासाठी :

क) पुणे - सातारा - कोरेगाव - रहिमतपुर - पुसेसावळी - भुषणगड.

२) पुणे - सातारा - कोरेगाव - पुसेगाव रहिमतपुर पुसेसावळी - रहाटणी - भुषणगड.
⚫️राहाण्याची सोय :- गडावरील हरणाई देवीच्या मंदिरासमोरील शेडमध्ये रहाण्याची व्यवस्था होऊ शकेल.
⚫️जेवणाची सोय :-गडावर जेवणाची व्यवस्था नाही.आपण स्वत: करावी.
⚫️पाण्याची सोय :-गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे.




Song Credits:
Singer: Yogesh Khandare
Music: Yogesh Khandare
Lyrics: Vishnu Thore

show more

Share/Embed