Srushti Adhipati Ganesh / सृष्टी अधिपती गणेश - माघी गणेश २०२२ | Dr. Tejas Lokhande
Tejas Lokhande Tejas Lokhande
651 subscribers
15,969 views
368

 Published On Feb 6, 2022

मूर्तीत तुला पाहताना तुझं अमूर्त स्वरूप कसं असेल याचा विचार करत होतो. आतापर्यंत अनेकदा सह्याद्रीतील गडकोटांच्या अंगाखांद्यावर बागडताना तुझ्या निराकार निर्गुण रूपाची प्रचिती प्रत्येक वेळेस अनुभूती देऊन गेली. आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी या पंच महाभूतांचा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध अनुभवला तो तुझ्याच अमूर्त रूपात. सजावट आकारताना तुझं निराकार रुप आपोआप साकारत गेलं. प्रपातातून प्रकटणारा, गडकोटातून डोकावणारा, सूर्यकिरणांतून प्रकाशणारा, बिजातून अंकुरणारा, गर्भातून हुंकारणारा, वनातून अवतरणारा, फुलांतून बहरणारा, पक्षीरुपात विहरणारा, वाऱ्यासवे घोंघावणारा....

मनातला-जनातला-रानातला-विवरातला- वावरातला तुझा वावर.... या वास्तुतलं तुझं आगमन हे केवळ निमित्त ! तुझं भक्तांच्या भक्ती भावनेत असणारं शाश्वत वास्तव्य हे खरं वास्तव !

तुझं अस्तित्व शोधताना वेद, उपनिषदे, पुराणे यांना शब्द उणे पडले...मी तर साधा पामर...!!

तुझे देणे ल्यालेली पंच ज्ञानेंद्रिये तुझी जाणीव, पुन्हा एकदा करुन देत राहतील, शब्द-स्पर्श- रुप- रस - गंधातून....

कृतज्ञ मी-कृतार्थ मी 🙏🙏

संकल्पना - डॉ. तेजस लोखंडे
मूर्तिकार - संजय बाळकृष्ण गावडे
सजावट - निलेश भालेराव
सतीश जगनाडे
सुमित माने
डॉ. तेजस लोखंडे

show more

Share/Embed