कमलापूर हत्ती कॅम्प वाचलाच पाहिजे...!
The Patil's The Patil's
9.98K subscribers
307 views
40

 Published On May 27, 2022

गडचिरोलीतील कमलापूर हत्ती कॅम्प वाचलाच पाहिजे..!

- आनंदवन - सोमनाथ मधील श्रम संस्कार शिबीर आटोपून आम्ही डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या भेटीसाठी निघालो होतो. या दरम्यानच्या काळात आलापल्ली इथे एका फॉरेस्ट मधील अधिकारी मित्राकडे आम्ही जेवणासाठी थांबलो. त्याच्याकडे गेल्यावर कमलापूर मधील हत्ती कॅम्प विषयी कळले आणि आम्ही आधी कॅम्प करू आणि मग जेवण करून हेमलकस्याकडे निघू असे ठरवून आम्ही कमलापूर कॅम्प कडे रवाना झालो.

अल्लापल्ली पासून घनदाट जंगलात आमचा प्रवास सुरू झाला होता. कमलापूर कॅम्प तसा नक्षली पट्टा, या कॅम्पात या पूर्वी नक्षली चकमकी झाल्याचं आमच्या सोबतच्या एका मित्राने सांगितले. मी उंच की तू उंच अशी आभाळाशी स्पर्धा लागलेली जंगलातील सागाची झाडे मागे पडत होती आणि आम्ही पुढे सरकत होतो. एखादेच गाव रस्त्यात लागले असेल, जिथे विड्या बनविण्यासाठी लागणाऱ्या तेंदूच्या पानांचे काम सुरू होते.

आम्ही कमलापूर कॅम्प जवळ पोहचलो तसे निसर्गाच्या अप्रतिम नजाऱ्याने मंत्रमुग्धच केले. अप्रतिम चित्रात असतो तश्या आकाराचा तलाव, तलावाभोवती लांबवर पसरलेले हिरवळीचे मैदान, आजूबाजूला असणाऱ्या छोट्या छोट्या टेकड्या, टेकड्यांवरील जंगलं, दूरवर पसरलेली मोठी मोठी वृक्षे आणि या परिसरात डौलात हुंदडणारी हत्तींची टोळी.. कोणी ९० वर्षाचा तर कोणी नुकताच जन्माला आलेला.. एक भलामोठा हत्ती तर आम्हाला रस्त्यावरच आडवा होता. माहूताने त्याला बांधून छोट्याशा पाण्यात उभा केला होता.

तर या कमलापुर कॅम्पात ८-९ हत्ती आहेत आणि कॅम्पच लोकेशन बाप आहे. आम्ही पोहचलो, फोटो घेतले आणि तिथल्या स्थानिकांशी बोलू लागलो. तेंव्हा असे लक्षात आले की या कॅम्पमधील ४-५ हत्ती गुजरातला नेण्याचा घाट घातला आहे. ज्याला आम्हा सर्वांचा विरोध आहे. सरकारने हा निर्णय रद्द करून हीच कमलापूरची साईट प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून विकसित करावी, ही त्यांची मागणी.. आपले हत्ती दुसऱ्या राज्यात पाठविण्यापेक्षा तिथले हत्तीची काळजी घेणारी २-३ माणसे वाढवावीत, हत्तींना प्रशिक्षण देणे या अतिशय छोट्या त्यांच्या मागण्या..!

गडचिरोलीचा विकास कसा करावा हा प्रश्न जर असेल तर पर्यटनाला चालना देण्याची गरज जास्त आहे, हे त्याचे उत्तर.. त्यामुळे निसर्ग अबाधित तर राहील, स्थानिकांना रोजगार मिळेल आणि महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना..! म्हणून हा हत्ती कॅम्प वाचलाच पाहिजे..!

आम्ही तर पूर्ण क्षमेतेने हा प्रश्न उचलणार आहोत. २४ मे रोजी मंत्रालयात विविध मंत्री, पदाधिकारी यांना निवेदने दिली असून प्राथमिक पायाभरणी सुरू केली आहे. कुठल्याही परिस्थितीत ही कॅम्प साईट बंद न होता अधिक जोमाने सुरू राहण्यासाठी प्रयत्नशील राहूयात..!

show more

Share/Embed