*मनःशांती प्राप्त करण्याचा सोपा सरळ मार्ग म्हणजे आत्मज्ञानाची गुरुकिल्ली - सरश्री*
Express Line Express Line
982 subscribers
522 views
49

 Published On Jul 1, 2024

मनःशांती प्राप्त करण्याचा सोपा सरळ मार्ग म्हणजे आत्मज्ञानाची गुरुकिल्ली - सरश्री

( सरश्री यांच्या ध्यान शिबिराला उदंड प्रतिसाद )

प्रख्यात वक्ते सरश्री यांचे विचार ऐकण्यासाठी हजारो पुणेकरांची सिंहगड रोड येथील मनन आश्रम येथे मोठ्या प्रमाणात उपस्थिती  होती. निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या पुण्यातील मनन आश्रमाच्या सुंदर आणि पवित्र भूमीवर हा कार्यक्रम नुकताच पार पडला. या ठिकाणी तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक सरश्री यांनी ध्यानाविषयी सखोल माहिती दिली. ते म्हणाले रोजच्या धावपळीच्या आयुष्यातल्या अडचणी, त्यामुळे येणारे नकारात्मक विचार, यामुळे तुम्हाला सतत मानसिक त्रास होतो आपण   शांत आणि संतुष्ट जीवन कधीच जगू शकत नाही, असं तुम्हाला वाटत असेल तर संपूर्ण मनःशांती प्राप्त करण्याचा सोपा, सरळ मार्ग म्हणजे आत्मज्ञानाची गुरुकिल्ली हा होय.

सरश्री म्हणाले ध्यानाच्या समुद्रात डुबकी प्रत्येकाने मारायला हवी आहे. ध्यानात खूप मोठी ताकद असून ध्यानातून ध्येय प्राप्त करता येते. ध्यानातून मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. ध्यान हे प्रत्येकासाठी आवश्यक असून कोणत्याही धर्मातील व्यक्ती ध्यान करू शकते. म्हणून ध्यान रोज करायला हवे. यावेळी सरश्री यांनी सलग पंधरा दिवस ध्यानस्थ बसण्यासाठी प्रत्येकाला आवाहन केले असून ध्यानाची महती कळण्यासाठी हे आव्हान प्रत्येकाला दिले आहे.

यावेळी सदाफुली वनस्पतीच्या हजारो बियांचे सर्वांना वाटप करण्यात आले. सदाफुली ही वनस्पती जशी वर्ष भर सदाबहार फुलत राहते. तसेच प्रत्येकाचे आयुष्य सदैव फुलत राहो. असे ही ते पुढे म्हणाले. आझादीचा उत्सव १५ ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे.

📱

show more

Share/Embed