Thokuni Dand Salami Deto Umaji Naik_ठोंकुणी दंड सलामी देतो उमाजी नाईक Mp3 Song
Ganga Art kothali Ganga Art kothali
3.21K subscribers
285,937 views
2.3K

 Published On Oct 6, 2019

Thokuni Dand Salami Deto Umaji Naik
ठोंकुणी दंड सलामी देतो उमाजी नाईक Mp3 Song
Ganga art
Kothali.
Ta Omerga Dist Osmanabad
*********************************
*********************************

महाराष्ट्रभूमी ही स्वातंत्र्यप्रेमी योद्धा-रत्नांची खान आहे. मोगली सत्तेविरुद्ध स्वराज्याचा उठाव करत छ. शिवाजी महाराजांनी पहिले देशी राज्य स्थापन केले. पुढे इंग्रजांचा धोका लक्षात घेउन यशवंतराव होळकरांनी इंग्रजांविरुद्ध एकहाती युद्ध पुकारुन १८०३ ते १८१० या काळात तब्बल अठरा वेळा इंग्रजांना पराभूत केले. पण दुर्दैवाने त्यांचा १८११ साली अकाली मृत्यु झाला आणि स्वातंत्र्यलढा जवळपास थांबल्यात जमा झाला. १८१८ साली इंग्रजांची सत्ता देश गिळुन बसली. पण स्वातंत्र्याची आस मनी जागवत लढा स्वातंत्र्यलढा उभारायला महराष्ट्राच्या मातीतुन शिवाजी महाराज आणि यशवंतरावांपासून प्रेरणा घेत एक महावीर इंग्रजांशी सर्वकश युद्ध करायला उभा ठाकला...तो म्हणजे आद्य क्रातीवीर उमाजी नाईक!

७ सप्टेंबर १७९१ रोजी उमाजी नाईकांचा लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे या रामोशी/बेरड दांपत्याच्या उदरी भिवडी (ता. पुरंदर) येथे जन्म झाला. वंशपरंपरेने पुरंदर किल्ल्याचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळे त्यांना नाईक ही उपाधी होती. १८०३ साली दुस-या बाजीरावाने इंग्रजांचे अंकितत्व पत्करल्यानंतर इंग्रजांनी किल्ल्यांच्या रक्षणासाठी असलेली परंपरागत तरतुद नष्ट केली आणि रामोशी-बेरडांची हकालपट्टी केली.

गंगा आर्ट कोथळी

शिवकाळापासुन गड-कोटांचे रक्षक असनारे रामोशी यामुळे हादरुन जाणे व इंग्रज सत्तेचा संताप येणे स्वाभाविक होते. हा समाज मुळात स्वतंत्रताप्रिय. त्यात उत्तरेत यशवंतराव होळकर इंग्रजांचा कसा धुव्वा उडवत आहेत या वार्ताही महाराष्ट्रात येतच होत्या. त्यापासुन प्रेरणा घेत उमाजींनी वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षापासुन क्रांतीकार्य सुरु केले. जेजुरीच्या खंडेरायासमोर आपल्या विठोजी नाईक, कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी अशा काही मित्रांसोबत भंडारा उधळत इंग्रजी राज्य नष्ट करण्याची प्रतिज्ञा केली. पुढे मोजक्या सहका-यांसह इंग्रज, वतनदार यांच्यावर गनीमी काव्याने हल्ले करुन मिळालेली लुट गोरगरीबांत वाटायला सुरुवात केली. आयाबहीणींची अब्रू वाचवली. इंग्रज यामुळे अस्वस्थ होणे स्वाभाविक होते.

show more

Share/Embed