Pune Car Attack: लवळे-नांदे रस्त्यावर इंजिनिअरच्या गाडीवर हल्ला, Mulshi Pattern की सत्य वेगळंच ?
BolBhidu BolBhidu
2.17M subscribers
108,105 views
2.2K

 Published On Oct 3, 2024

#BolBhidu #PuneViralVideo #PuneCarAttack

रात्रीची वेळ, रस्त्याच्या दोन्ही बाजूला अंधुकसा उजेड आणि त्यातून भरधाव वेगात प्रवास करणारी एक कार. पण आपलं लक्ष जातं ते कारच्या आजूबाजूला असलेल्या गाड्यांवर, काही तरुण गाडीच्या बाजूनं, काही तरुण गाडीच्या पुढं होते. काठी, रॉड आणि दगडानं कारवर हल्ला केला जातोय. बाईकनं पाठलाग केला जातोय. कार थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. कारमधली महिला घाबरलेल्या अवस्थेत आपल्या नवऱ्याला कार आणखी जोरात पळवायला सांगते. संकटातून सुखरुप सुटका व्हावी, यासाठी ती ओम नम: शिवाय, श्री स्वामी समर्थ नावाचा जप करते. पण हल्ले थांबत नाहीत. तरुणांकडून पाठलाग सुरूच ठेवला जातो. कारवर काठीनं मारून गाडी साईडला घ्यायला सांगितलं जातं. पण गाडी कुठेच थांबत नाही.

आपल्या बायकोला धीर देत, गाडीतला माणूस कार थेट घरी घेऊन जातो, हे सगळं दृश्य दिसतं एका व्हायरल झालेल्या व्हिडिओत. हा व्हिडीओ आहे पुण्यातल्या रस्त्यांवरचा. लवळे-नांदे रस्त्यावरचा. पीडित तरुणानं या सगळ्या घटनेचा व्हिडीओ शूट करून आपल्या युट्यूब चॅनेलवर, सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर केलाय. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुण्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. पण बोलभिडूनं जेव्हा पोलिसांशी संवाद साधला, तेव्हा या घटनेची दुसरी बाजू आलीये. हा हल्ला लुटीसाठी केला नव्हता, असं पोलिसांकडून सांगण्यात येतंय. हा हल्ला लुटीसाठी केला नसेल, तर मग कशासाठी केला होता ? मध्यरात्री कारवर हल्ला करणारे तरुण नक्की कोण होते ? नेमकं घडलेलं काय ? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed