14 किलोचा बोकूड आणून बनविले कंदुरी मटण | Complete Kanduri Mutton Recipe | कंदुरी मटण संपूर्ण रेसिपी
Shivar Food Shivar Food
73.8K subscribers
109,513 views
774

 Published On Jun 28, 2024

14 किलोचा बोकूड आणून बनविले कंदुरी मटण | Complete Kanduri Mutton Recipe | कंदुरी मटण संपूर्ण रेसिपी

ग्रामीण भागात कंदुरीचे जेवण म्हटले की दोन तीन दिवस चर्चा होत राहते. निमंत्रण मिळाले की आवर्जून कंदुरी मटणावर ताव मारायलाअनेक जण जातात. एरवी इतर जेवणासाठी टाळले जाते. पण कंदुरी जेवण करायला जाण्यासाठी चढाओढ लागते. पूर्वी गावाकडे नवस फेडण्यासाठी कंदुरीचा नेवैद्य दाखवून काही निवडक लोकांना जेवण करण्यासाठी बोलावले जाते. आजही ही परंपरा सुरू आहे. मात्र, पुढे अनेक ठिकाणी नॉनव्हेज जेवण देणाऱ्या हॉटेल्स सुरू झाल्या. बऱ्याच हॉटेलमध्ये आमच्याकडे कंदुरी जेवण मिळेल असे बोर्ड दिसून येतात. पण, कंदुरीसाठी अख्खा एक बोकूड लागतो. या बोकडाचे मटण एका डेगीत शिजवले जाते. नंतर कांदा, लसूण, आले, कोथिंबीर, घरगुती मसाला तसेच येसूर मसाला टाकून कंदुरीचा रस्सा बनविला जातो. आम्ही सिल्लोड तालुक्यातील भराडी गावाजवळील हॉटेल आठवण येथे भेट दिली. या हॉटेलमध्ये कंदुरी मटण बनविले जाते. या कंदुरी मटणाची संपूर्ण रेसिपी आज बघायला मिळणार आहे.

पत्ता - हॉटेल आठवण, सिल्लोड-कन्नड रोड, वांगी फाट्याच्या पुढे, भराडी गावाच्या अलीकडे, जि. छत्रपती संभाजीनगर

#kandurimutton
#कंदुरीमटण
#shivarfood
#nonveghotel
#villagefood

show more

Share/Embed