सोनपाठी सुतार आणि बिनभिंतीची शाळा | Black-Rumped Flameback Woodpecker |
Namrata Sonar Namrata Sonar
130 subscribers
492 views
23

 Published On Aug 31, 2024

नेहमीप्रमाणे आम्ही घरामागील परड्यात निवांत बसलो होतो. पक्ष्यांचा किलबिलाट नेहमीप्रमाणे चालूच होता, इतक्यात फणसाच्या झाडावर 'टक' 'टक' असा आवाज झाला. आधी काही दिसले नाही पण थोड्या वेळाने गर्द झाडांच्या फांदीतून एका सोनपाठी सुतार पक्ष्याचं जोडपे आणि पिल्लू दिसले. जोडपे झाडाच्या खोडावर चोच आपटून ते आपले अन्न शोधत होते, अधे मध्ये त्रिव आवाज करून एकमेकांशी संवाद करत होते, आपल्या पालकांना बघून ते पिल्लू त्याचे अनुकरण करत होते. पिल्लासाठी सर्व काही नवीन आहे असाच वाटत होते. हे सर्व अनुभवायला फार मजा येत होती.

निसर्ग हि खरंच बिनभिंतीची शाळा आहे. निसर्गाच्या या भिंती नसलेल्या, मोकळ्या, प्रसन्न शाळेतील विविध गुरु त्यांच्या गुणांची शिकवण देऊन आपले जीवन समृद्ध करतात.त्या फणसाच्या झाडामध्ये आम्हाला परोपकारी वृत्ती, सहनशीलता दिसली. तर त्या सुतार पक्ष्याच्या कुटूंबामध्येय आम्हाला चिकाटी, जिद्द, संयम या गुणांचे दर्शन घडते. निसर्गाच्या या भिंती नसलेल्या, मोकळ्या, प्रसन्न शाळेतील विविध गुरु त्यांच्या गुणांची शिकवण देऊन आपले जीवन समृद्ध करतात असे आम्हाला नेहमी वाटते 💚

show more

Share/Embed