महाराष्ट्र १०८ रुग्णवाहिका चालक मागण्यांबाबत आझाद मैदान, मुंबई येथेठिय्या आंदोलन / आमरण उपोषण
STAR MAHARASHTRA STAR MAHARASHTRA
443 subscribers
1,034 views
38

 Published On Jun 27, 2024

महाराष्ट्र १०८ रुग्णवाहिका चालक यांच्या मागण्यांबाबत आझाद मैदान, मुंबई येथे
ठिय्या आंदोलन / आमरण उपोषणाबाबत.
महोदय,
वरील विषयाला अनुसरून आपणास कळविण्यात येते की, २६ जानेवारी २०१४ पासून महाराष्ट्र
आपात्कालीन वैद्यकीय सेवा १०८ रुग्णवाहिका हा प्रकल्प शासनाने BVG इंडिया प्राय, लिमिटेड या कंपनीला
दिला असुन सदर प्रकल्पामध्ये आम्ही वाहनचालक म्हणून काम करत आहोत. मागील १० वर्षांपासून आम्ही
आमचे कर्तव्य अखंड रित्या पार पाडीत आहोत. कोविड-१९ सारख्या वैश्विक महामारी मध्ये आम्ही आमच्या
परिवाराची व जीवाची परवा न करता निरंतर जनसेवेसाठी रात्र-दिवस कर्तव्य पार पाडलेले आहे. तसेच अपघात,
विषबाधा, सर्पदंश, हृदयविकार, प्रसूती, महापूर, आग लागणे, दरड कोसळणे अशा सर्व प्रकारच्या नैसर्गिक
आपत्ती व आपात्कालीन स्थितीमध्ये आम्ही नेहमी फ्रंट लाईनला घेऊन काम करित आहोत, तसेच राजकीय
जनसभा, यात्रा, व्हीआयपी दौरा, धार्मिक तथा शासकीय उत्सव-महोत्सव आणि अधिवेशन इत्यादी मध्ये सुद्धा
२४ ते ४८ तास सतत सेवा देत आहोत.
महाराष्ट्र शासनाने १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या
गट-ब, गट-क आणि गड या प्रवर्गातील कंत्राटी तत्वावर दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना सरळ
सेवासमायोजन करून कायम सेवेत घेण्याची तरतूद केलेली आहे. मात्र या शासन निर्णयामध्ये दहा वर्षे निरंतर
उत्कृष्ट आपात्कालीन सेवा देऊन सुद्धा आम्हा १०८ रुग्णवाहिका चालकांचा कोणत्याही प्रकारचा विचार केला
गेलेला नाही.
त्यामुळे आमच्या सेवेवर शासनाने केलेले दुर्लक्ष आणि आमच्या मागणी पूर्ततेसाठी आम्ही 'आझाद
मैदान, मुंबई येथे येणाऱ्या पावसाळी अधिवेशन २०२४ मध्ये दि. २७ जुन २०२४ ते १२ जुलै २०२४ दरम्यान
ठिय्या आंदोलन व आमरण उपोषण करणार आहोत.
कृपया, आपल्या वृत्तपत्र / वृत्तवाहिनी या प्रसारमाध्यमांमध्ये बातमी लावून आम्हांस न्याय मिळवून
देण्यासाठी सहकार्य करावे, ही नम्र विनंती.
आपल्या सहकार्यांच्या अपेक्षेत. धन्यवाद !

#maharashtra #108 #108ambulance #azadmaidan #starmaharashtra #mumbainewschannel #cmshinde #maharashtranews #maharashtranews #maharashtrasamachar #ashaworker #mumbaiindians #obcreservation

show more

Share/Embed