LINGYA GHAT : लिंग्याघाट - सह्याद्रीच्या कुशीत लपलेला एक सौंदर्य अलंकार 😍😍
Mi Vatsaru  मी वाटसरू Mi Vatsaru मी वाटसरू
19.9K subscribers
1,090 views
94

 Published On Aug 12, 2023

लवासा सिटी येथे आल्यानंतर पुढे भोईणी मूगाव- कोळोशी, तसेच शेवटचे धामण ओहोळ गाव कोकण किनारपट्टीला लागून आहे आणि त्याच किनारपट्टीला लिंग्या घाट धबधबा आहे, त्या ठिकाणी धुकं व भरपूर पाऊस पडत आहे. हिरवी गार चादर पसरलेले डोंगर, कडे पाहायला मिळतात. तसेच अनेक पायवाटा असल्याने पर्यटक पायवाटा चुकू शकतात. त्यामुळे धामणओहोळ गावातील नागरिकांची पर्यटकांनी मदत घ्यावी.
मार्ग : पिरंगुट-मुठा-लवासा-धामन ओवळ : ८० किमी
मिलिंद भोसले. मी वाटसरू

सह्याद्रीच्या डोंगररारांगांतील गडकिल्ल्यांचे सौंदर्य पावसाळ्यात खुललेले असते. हिरवाईने डोंगर नटलेले असतात. या डोंगररांगांतून चहूबाजूने धबधबे कोसळतात. अनेकदा अनेक युट्युबर, रिल्सस्टार या ठिकाणाचे फोटो व व्हिडिओ सोशल मिडीयावर टाकतात. त्यातील सौंदर्य पाहून अनेक नवखे या ठिकाणांना भेटी देण्यासाठी येतात. मात्र, अशा ठिकाणांना भेट देताना योग्य खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.
माहिती असलेला वाटाड्या (गाइड) किंवा कोणी स्थानिक व्यक्ती सोबत नसल्याने अनेकदा पर्यटक रस्ता भरकटतात. काहीवेळा तर पर्यटक ट्रेकिंगसाठी आवश्यक असलेले सामान सोबत न घेताच गडाची चढाई करत असतात. मोबाईलची बॅटरी सांभाळा :हौसी पर्यटक मोबाईलच्या कॅमेऱ्यात ठिकाणांचे सौंदर्य टिपण्यातच धन्यता मानत असतात. अशावेळी अनेकदा पर्यटक भरकटून दुर्घटना झालेल्या आहेत. मोबाईलचा अतिवापर केल्याने व बॅटरी डिस्चार्ज झाल्याने भरकटलेल्या पर्यटकांकडे मदतीसाठी संपर्क करण्यासाठी कोणतेही साधन नसते. काही तरुण मोबाईलमध्ये फोटो टिपण्यासाठी अगदी दरीच्या कडेला जाऊन बसलेले असतात. अनेकदा त्यामुळे अपघात देखील झालेले आहेत.
ड्रोनच्या फोटोंना भुलू नकासोशल मीडियावर सह्याद्रीतील टाकलेले फोटो व व्हिडिओ हे अनेकदा ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने घेतलेले असतात. तसेच, त्याठिकाणी जाण्यासाठी अनेकदा कसरत करून जावे लागत असते. आपण फक्त फोटो व व्हिडिओ पाहून अशा ठिकाणांना भेटी देण्याचे शक्यतो टाळावे.ट्रेकसाठी पूर्ण तयारी हवीच सह्याद्रीतील सध्याचे पर्यटकांचे चित्र दुर्दैवी आहे. अगदी पाच वर्षांपूर्वी ट्रेकिंगच्या क्षेत्रात एखादा नवीन गड पाहायला जाताना वेळ, काळ, सोबती या सर्व गोष्टींची काळजी केली जायची. त्यावेळी शक्यतो पावसाळ्यात डोंगरी किल्ल्यांना, वनदुर्गांना शक्यतो कोणीही जात नसत. सर्वसाधारणपणे हिवाळा व उन्हाळ्यातील महिने हे ट्रेकचे असायचे. ट्रेक पूर्ण तयारीनिशी केले जायचे. त्यामुळे सह्याद्रीत गडकिल्ल्यांच्या ट्रेकमध्ये कुणाचा जीव गेला, ही बातमी अगदी अपवादानेच कानावर पडत असे. पावसाळ्यात साधी वाटणारी ठिकाणे धोकादायक ठरू शकतात.
हरिश्चंद्रगडावर नुकतीच झालेली घटना अतिशय दुर्दैवी असून, या घटनेतून स्थानिक गाईडचे महत्त्व अधोरेखित होत आहे. प्रचंड पाऊस, वादळी वारा व धुके ही परिस्थिती असताना काही दिवस भटकंती टाळणेच योग्य राहील. कोणत्याही नवख्या ठिकाणी जाताना व आपल्याला पुरेसा अनुभव नसल्यास स्थानिक गाइड सोबत ठेवावाच.

Lingya ghat waterfall is on the way ahead of Lavasa city around 13.5 km, the name of this waterfall is based on the pinnacle seen there which is called Lingya. The pinnacle is been worshipped by the local people. The base village for Lingya ghat waterfall is Dhamanohol, Maharashtra.
Amazing view of three waterfalls and panoramic view of the valley. A pinnacle right in the middle of the route is one of the centers of attraction. Paddy fields while heading to the Lingya ghat waterfall.
Please take a guide to visit Lingya Waterfall, Don’t throw any kind of waste or garbage it will ruin the beauty of this place, Go in small groups. Don’t climb on the pinnacle which is near the waterfall
Head from Pune – Chandini Chowk – Pirangut – Lavasa city – Dhamanohol Village. 80 Km
Head from Mumbai – Lonavala – Wakad – Pirangut – Lavasa city – Dhamanohol Village.

#Lavasa #beauty_of_Sahyadri #Kurdugad #how_to_reach_Lingya_ghat_waterfall #incrediable_maharashtra #mulshi.‪@Mivatsaru‬

show more

Share/Embed