आज भाकरी केलीय? मग पिठलं हवंच |खरपूस बेसनाचं चवदार पिठलं | Maharashtrian Pithala Recipe |
Sugran Seema Sugran Seema
9.09K subscribers
71,543 views
533

 Published On Feb 20, 2024

#पिठलं #बेसन #खमंग #भाकरी #रूचकररेसिपी #pithla #tastyfood #veg

https://youtube.com/@SugranSeema?si=W...

bajrichi bhakri:    • खुसखुशीत बाजरीची भाकरी । बाजरीच्या भा...  
साहीत्य:

nachani bhakri:    • लाटून करा नाचणीची भाकरी | नाचणीच्या भ...  


१वाटी. बेसन
३चमचे. तेल
१चमचा लसूण मिरचीचा खरडा
१/२चमचा राई
१ कांदा बारीक कापलेला
२ लाल मिरच्यांचे तुकडे
२ लसूण पाकळया उभया चिरलेल्या
१/२वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली
१/२चमचा मीठ
१/२चमचा हळद
१. कोकम

कृती:

प्रथम मध्यम गॅसवर कढईत ३,४ मिनिटं बेसन कोरडं, खमंग भाजून घ्या.प्लेट मध्ये काढा.थंड झाल्यावर त्यात ३ वाट्या पाणी घालून ढवळा. गुठळया मोडून काढा

नंतर कढईमध्ये ३,४ चमचे तेल घेऊन त्यात राई,हिंग,कांदा घालून ढवळा . कांदा हलकासा गुलाबी झाला की त्यात मिरची लसूणचा ठेचा/खरडा घालून ढवळा .लसणाचा वास कमी झाल्यावर त्यात हळद , मीठ घालून ढवळा . नंतर त्यात बाऊल मधली बेसन ची पातळ पेस्ट घालत घालत एकीकडे ढवळा. बेसन पटकन घट्ट होतं. वाटलं तर आणखी १वाटी पाणी घाला. ढवळा. त्यात १ कोकम घाला. आणि झाकण ठेऊन ५,६ मिनिटं शिजवा. नंतर झाकण काढून पहा. पिठलयावर चकाकी आली की समजायचं पिठलं शिजलं आहे.गैस घालवा.
फोडणीच्या भांड्यात २चमचे तेल घाला त्यावर कढीपत्त्याची पानं, पातळ चिरलेला लसूण , लाल मिरचीचे तुकडे घालून चरचरीत फोडणी पिठल्यावर घाला. वरून कोथिंबीर घालून पीठलं सर्व्ह करा.

––––––––––––––––––––––––––––––
chill. by sakura Hz   / sakurahertz  
Creative Commons — Attribution 3.0 Unported — CC BY 3.0
Free Download / Stream: http://bit.ly/chill-sakuraHz
Music promoted by Audio Library
• Chill – sakura Hz...
––––––––––––––––––––––––––––––

show more

Share/Embed