अजिंक्यतारा | Ajinkyatara Fort-स्वराज्याची चौथी राजधानी
सह्याद्रीसुख सह्याद्रीसुख
602 subscribers
19,746 views
133

 Published On May 11, 2024

#fort #pune #shivajimaharaj #sahyadri #near #oneday #satara #rajarammaharaj #tararani #trek #sahyadrisukh #fort #pune #shivajimaharaj #marathi #fort #fortinmaharashtra #tour #travel #vlog #tour #guide #ajinkyatara #fort #trek #forts #in #satara #district #summer #visit #places #near #satara #close #to #city


अजिंक्यतारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यामधील सातारा या जिल्ह्यातील सातारा गावातीलच एक किल्ला आहे.

प्रतापगडापासून फुटणाऱ्या बामणोली रांगेवर अजिंक्‍यतारा उभारलेला आहे. अजिंक्‍यताऱ्याची उंची साधारणत: ४४०० फूट असून त्याचा दक्षिणोत्तर विस्तार ६०० मीटर आहे.

सातारचा किल्ला (अजिंक्‍यतारा) म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड मग रायगड त्यानंतर जिंजी आणि चौथी अजिंक्‍यतारा. साताऱ्याचा किल्ला हा शिलाहार वंशातल्या दुसऱ्या भोजराजाने इ.स. ११९० मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ.स.१५८० मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्‍नी चांदबिबी हिला किश्वरखान याने येथे कैद करून ठेवले होते.या किल्ल्याचा उपयोग सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत जेल म्हणून केला जात असे. छत्रपतीशिवाजीमहाराजांच्या राज्याचा विस्तार होत असतांना २७ जुलै १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला.छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर दोन महीने वास्तव्यास होते. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. शिवाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर १६८२ मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला. इ.स. १६९९ मध्ये औरंगजेबाने साताऱ्याच्या दुर्गाला वेढा घातला. त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. १३ एप्रिल १७०० च्या पहाटे मुघलांनी सुरूंग लावण्यासाठी दोन भुयारे खणली आणि बत्ती देताच क्षणभरातच मंगळाईचा बुरूज आकाशात भिरकावला गेला. तटावरील काही मराठे दगावले तेवढ्यातच दुसरा स्फोट झाला. मोठा तट पुढे घुसणाऱ्या मोगलांवर ढासळला व दीड हजार मुघल सैन्य मारले गेले. किल्ल्यावरील सर्व दाणागोटा व दारूगोळा संपला आणि २१ एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घेतला. किल्ल्यावर मोगली निशाण फडकण्यास तब्बल साडेचार महिने लागले. किल्ल्याचे नामकरण आझमतारा झाले .ताराराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्याचे नामातंर अजिंक्‍यतारा केले., पण पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला. मात्र १७०८ मध्ये शाहूने फितवून किल्ला घेतला आणि स्वतःस राज्याभिषेक करून घेतला. मराठी साम्राज्याचा कारभार हाकताना छ.शाहूंनी सातारा शहराची स्थापना यावेळी केली. दुसऱ्या शाहूच्या निधनानंतर किल्ला ११ फेब्रुवारी १८१८ मध्ये इग्रजांकडे गेला.

कसे जावे?
स्वारगेट -- पुणे -बंगलोर हायवे -- कापूरव्होळ -शिरवळ --सातारा --गोडोली --किल्ले अजिंक्यतारा (130-140 किमी )

खर्च?
500-600 रुपये पेट्रोल
100-200 रुपये नाश्ता

वेळ?
जाणे -येणे 6-7 तास
किल्ला पहाणे -1-2 तास

खर्च?
200-300 रुपये पेट्रोल
50-100 रुपये नाश्ता -

किल्ल्यावरील काही बदलण्यासारख्या गोष्टी :

--गडाचा घाट चढताना हिरवी चादर दिसते, सातारा मध्ये भरपूर किल्ल्यावर्ती हे चित्र पहायला भेटत. ह्याच कारण काय आहे नक्की?ह्या गोष्टींकडे कुणाचाच लक्ष नाही का?
--किल्ल्याच्या मुख्य द्वारात प्रवेश करताना शूटिंग साठी आलेली लोक किल्ल्याच्या प्रवेशद्वारात कुठेही पवित्र्य न राखता जेवायला बसलेली दिसली.
--आकाशवाणी केंद्र असं बांधले आहे की किल्ल्याचा तटबंदीचा मार्ग पूर्णपणे झाकून टाकलाय.
--किल्ल्याच्या दक्षिणमुखी प्रवेशद्वारावर्ती तरुण आणि तरुणी कोपऱ्यात बसले होते (दोघेही मराठीच होते).
--इतिहासाकालीन असेलेली धान्य कोठारा मध्ये कचरा टाकलेला दिसतो (उतरायची व्यवस्था नसल्यामुळे आम्हाला साफसफाई करता नाही आली).


आम्ही केलेली अजून काही गडांची ट्रेकिंग आणि संपूर्ण माहिती :

पांडवगड -कुणीही न दाखवलेला (101%):

   • पांडवगड | Pandavgad Fort- कुणीही न दा...  

सज्जनगड-कुणीही न पाहिलेला:

   • सज्जनगड | Sajjangad Fort- न पाहिलेला ...  

मल्हारगड -किल्ल्यावर आढळणाऱ्या वेगवेगळ्या वास्तू माहिती सोबत :

   • मल्हारगड | Malhargad Fort-मराठ्यांनी ...  

तिकोना - पुण्याजवळ सहज एका दिवसात पोचून आनंद देऊन जाणारा :

   • पवनमावळाचा पहारेकरी किल्ले तिकोना | T...  

रायरेश्वर -हिंदवी स्वराज्याची शप्पथ जिथे घेतल्याचा आभासी अनुभव देऊन जाणारा :

   • रायरेश्वर पठार | Rayreshwar Fort-शपथ ...  

केंजळगड- गांधी टोपीच्या आकाराचा छोटासा एका दिवसात होण्यासारखा सोप्प्या चढाईचा गड :

   • केंजळगड | Kenjalgad Fort- टेहळणी किल्...  

राजगड -स्वराज्याची पहिली राजधानी, स्वराज्याच वैभव दाखवणारा उन्हाळ्यात अनुभवलेला एक सुखद अनुभव :

   • स्वराज्यांची पहिली राजधानी - राजगड | ...  

रोहिडा - भोर जवळ वसलेला एक दुर्लक्षित वैभवसंपन्न, सोप्प्या चढाईचा अतिशय सुंदर गड :

   • किल्ले रोहिडा | Rohida Fort #shivajim...  

तोरणा - स्वराज्याच तोरण बांधून देणारा, उन्हाळ्यात आपला राकटपणा दाखवणारा वेल्हे तालुक्यातला प्रचंडगड :

   • तोरणा | Torna Fort- स्वराज्याचे पहिले...  




Music:Views
Musician:Ikson
License:https://ikson.com/track/89/views

show more

Share/Embed