बायको आणि मी गेलो रानात 😍 | रानातली कामे आणि दुपारचे जेवण - Ambavali, Mandangad (Konkan)
S FOR SATISH S FOR SATISH
383K subscribers
590,226 views
6.6K

 Published On Aug 9, 2021

बायको आणि मी गेलो रानात 😍 | रानातली कामे आणि दुपारचे जेवण - Ambavali, Mandangad (Konkan) आम्ही शेतीची कामे उरकल्यावर आंबे आणि काजू लागवड करायला रानात गेलो होतो. आमचे रान खेतूरपाल येथे आहे. पाऊस पडायच्या अगोदर आम्ही रानात जाऊन झाडांसाठी खड्डे खोदले होते. आमच्या गावातून खेतूरपाल येथे जायला एक तास लागतो. जंगलातला प्रवास करून तिथे जावे लागते. आम्ही झाडे घेऊन रानातला प्रवास सुरु केला. संपूर्ण परिसर हिरवागार होता. रानात जाताना रस्त्यारस्त्याला वहाळ लागले. रानात जातानाचा अनुभव अप्रतिम होता. आम्ही रानात जाऊन झाडे लावली. दुपारी रानात जेवण केले. रानात जाऊन जेवण करणं आणि ते शेतावर बसून खाणं यासारखं सुख कशात नाही. आम्ही झाडे लावून झाल्यावर आणखी झाडांसाठी खड्डे खोदले. बायको वर्षाने खूप आवडीने कामे केली. तिची मेहनत सुद्धा खूप आहे. तिच्या सोबतीमुळे आम्ही सगळं काही करतोय. रानात गोठणीवर जाऊन पाणी प्यायलो. संध्याकाळी घरी येताना पुन्हा फ्रेश झालो. आज दिवसभर रानात कामे केली. गावाकडे रानात जाऊन काम करायला जाम मजा येते. तुम्हाला या व्हिडिओमध्ये बायकोसोबत रानातला प्रवास, फेरफटका दाखवला आहे. रानात जाऊन आम्ही झाडे लावली ते दाखवले आहे. रानात जाऊन जेवण केले ते दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेन्ट करायला विसरू नका. #BaykoAaniMiGeloRanat #RanatliKame #DuparcheJevan
#RanatleJevan #sforsatish

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

show more

Share/Embed