#गांडूळपाणी
Farmgrip Agro Farmgrip Agro
272 subscribers
121 views
4

 Published On Aug 15, 2024

गांडूळपाणी (vermiwash)

सेंद्रिय शेतीमध्ये गांडुळे व गाडूळखताचे मोठे महत्त्व आहे. या लेखामध्ये गांडूळखत अर्क बनवणे आणि वापर या विषयी जाणून घेऊ.

गांडूळखताप्रमाणेच त्याचा अर्कही उत्तम पीकवर्धक मानला जातो. त्यामध्ये मुख्य अन्नद्रव्यासह सूक्ष्म मूलद्रव्ये असून, ती पिकांना त्वरित उपलब्ध होतात. परिणामी पिकांची प्रतिकारक्षमता वाढून उत्पादनाला चालना मिळते. 

साहित्य 

दोन माठ-एक लहान एक मोठा

तिपाई 

अर्धवट कुजलेले शेणखत व सेंद्रिय पदार्थ 

गिरिपुष्प, लुसर्न घास व कडूनिंबाचा कोवळा पाला

पूर्ण वाढ झालेले गांडूळे १००० अथवा अर्धा किलो.

गरजेइतके पाणी 

अर्क जमा करण्यास चिनी मातीचे अथवा भांडे

पोयटा माती

कृती 

जुना माठ घेऊन त्याला तळाला बारीक छिद्र करून त्या छिद्रात कापडाची वात अथवा कापसाची वात टाकावी. तो माठ एका तिपाईवर ठेवावा.

माठाच्या तळात जाड वाळूचा ४ इंचाचा थर लावावा.

जाड वाळूच्या थरावर ३ इंचाचा पोयटा मातीचा थर लावावा.

त्यावर अर्धवट कुजलेल्या शेणखताचा थर लावावा. हलके पाणी मारावे.

त्याच ओलाव्यात अर्धा किलो पूर्ण वाढ झालेली गांडुळे सोडावीत.

गांडुळांना खाद्य म्हणून गिरिपुष्प, लुसर्नघास व कडूनिंबाचा कोवळा पाला प्रत्येकी अर्धा किलो शेणस्लरीसह मिसळावा.

मोठ्या माठावर लहान माठ पाणी भरून ठेवावा. त्याखाली तळाला छिद्र करून वात बसवावी म्हणजे थेंबथेंब पाणी मोठ्या माठात पडेल.

तिपाईच्या खाली व्हर्मिवॅाश जमा करण्यास चिनीमातीचे अथवा काचेचे भांडे ठेवावे. पहिल्या सात दिवसांत जमा झालेले पाणी पुन्हा वरील माठात टाकावे. त्यानंतर सात दिवसांनी जमा होणाऱ्या पाण्यास गांडूळखत अर्क किंवा गांडूळपाणी किंवा व्हर्मिवॅाश म्हणतात. ते पिकावर फवारणीस योग्य असते.

show more

Share/Embed