"त्यांनी काय नाही लिहिलं!"| Book Bro Episode 82| संवाद: नीलिमा बोरवणकर|डॉ. आशुतोष जावडेकर
Ashu's Tunes Ashu's Tunes
4.86K subscribers
2,116 views
59

 Published On Sep 27, 2024

नीलिमा बोरवणकर :  ज्यांच्या पहिल्याच संग्रहाला विजय तेंडुलकर यांची अप्रतिम प्रस्तावना प्राप्त झाली होती अशी ही लेखिका. त्यांनी काय नाही लिहिलं? - कधी मच्छीमारांच्या जगाचा अभ्यास करून लिहिलेली कादंबरी, अनेकानेक कथा - कधी तर गे मुलाच्या आईच्या भावना मांडणारी दीर्घकथा, कधी पंचतारांकित हॉटेल संस्कृतीवर ललितेतर पुस्तक, कधी दीडशेहून अधिक त्यांनी घेतलेल्या मुलाखतींचा संग्रह, कधी पर्यावरण आणि जंगल यांचा  घेतलेला ललित वेध, कधी कुमारवयीन मुलांसाठी कानडी भाषेचा मांडलेला मेळ, आणि आगामी नव्या पूर्व आणि पश्चिम जर्मनी यांच्या विलीनीकरणानंतर बदललेलं जग शोध घेऊ बघण्याचं लेखनस्वप्न ( रशियन भाषेची त्यांची पदवी आहेच!) 

सकाळी शूटिंगच्या आधी कामांची धावपळ, तसंच पळत गाठलेलं नीलिमाताईंचं घर. आता इथे एकदम शांत माहोल आहे.नीलिमाताई आणि त्यांचे यजमान माझं स्वागत करतात. शूट सुरु होतं. कधी मध्ये फोन वाजतो, कधी बेल, शेवटाला तर माईक तुटतो! पण बोलण्यात खंड पडत नाही, एक लेखिका आयुष्यभर आपण इतकं का लिहिलं, काय लिहिलं, काय घालमेल ते लिहिताना होती आणि या सगळ्या अवघड लेखनयात्रेतून काय गवसलं हे उत्कटपणे मांडत राहते. मी संवाद जोडत जातो इतकंच. अवश्य बघा, शेअर करा बुक ब्रो एपिसोड 82 

Dr. Ashutosh Javadekar interviews famous author Neelima Borwankar who speaks on her journey of penning down fiction and non fiction over last 25 years of her literary career.

#ashutoshjavadekar #marathi #books #authorinterviews #BookBro #authors #marathipustak

show more

Share/Embed