श्री दत्त नाम संकिर्तन स्तोत्र | Shree Datta Naam Sankirtan Stotra | Shree Dattaguru Stotra
Everest Bhakti Everest Bhakti
66.7K subscribers
12,763 views
184

 Published On Dec 29, 2023

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
श्री रंगाअवधूत स्वामी महाराज विरचित श्री दत्त नाम संकिर्तन हे आपल्या जीवनात सुख, समाधान व प्रसन्नता सदैव असण्या साठी अत्यावश्यक आहे
थोर संत रंगावधूत या दत्तसंप्रदायी भक्ताने भगवत्भक्तीचा प्रचार तर केलाच, त्याबरोबर महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात सक्रिय भाग घेतला. गुजरात प्रांतातील गोधरा या गावातील एका सुशिक्षित, स्वावलंबी व सुसंस्कृत कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व आईचे नाव रुक्मिणी असे होते. आई-वडील विठ्ठलभक्त होते. त्यांनी बाळाचे नाव पांडुरंग असे ठेवले होते. पांडुरंगाचा पिंड अध्यात्माचा होता. अध्यात्माची प्रगती करायची असेल तर एकांतवास हवा. म्हणून ते योग्य अशा जागेचा शोध घेऊ लागले. सुदैवाने त्यांना नर्मदा नदीच्या तीरावरील एका घनदाट जंगलातील नारेश्वर या लहानशा गावी येऊन राहिले.
लोक त्यांना ‘रंगावधूत महाराज’ व ‘पूज्य बापजी’ या नावाने संबोधू लागले. प.पू. वासुदेवानंद स्वामींच्या सूचनेनुसार पूज्य बापजींनी ‘श्रीगुरुलीलामृत’ हा ग्रंथ लिहिला.
त्यानंतर त्यांनी ‘दत्ताबावनी’ या ग्रंथाचेही लिखाण केले. ‘दत्ताबावनी’ हा बावन्न श्लोकी ग्रंथ असून आजूबाजूच्या कुटुंबांतील लोक याचे अत्यंत भक्तिभावाने गायन करतात. नारेश्वर येथील वास्तव्यात बापजी नीमवृक्षाखाली बसून भक्तांबरोबर आध्यात्मिक, धार्मिक व अन्य गोष्टींबाबत चर्चा करीत. नीमवृक्षाची पाने कडू असतात; परंतु परमपूज्य बापजी यांच्या वास्तव्याने व सहवासाने या नीमवृक्षाची पाने गोड झालेली आहेत. अश्या ह्या थोर संतानी विरचित केलेल्या “श्री दत्त नाम संकीर्तन” चे वाचन, चिंतन आणि मनन हे अत्यंत प्रभावशाली आहे.

🙏🏻 Everest Bhakti Latest Song -    • Everest Bhakti Latest Song  
🙏🏻 Dattaguru Song -    • Dattaguru Song | Dattatreya Mantra | ...  

♪ Song Available on ♪
WYNK - https://bitly.ws/395p5
Gaana - https://bitly.ws/395pM
Amazon Music - https://bitly.ws/395ph
JioSaavn - https://bitly.ws/395oU
Apple Music - https://bitly.ws/395pw
Spotify - https://bitly.ws/395pC

Singers: Mohan Morajkar
Music Composed: Paresh Shah (Bombay Paresh)
Lyrics: Traditional
Music Programmed by: Vishal J Singh
Recorded by: Kamlesh Sharma (Line in Studio - Mumbai)
Mix & Master by: Vishal J Singh
Video Concept: Kreative Kings
Video Edit & Graphics: Elite Hub - (Vishal Luhana)


#trending #dattaguru #mantra

show more

Share/Embed