मसूर डाळीची टिक्की / सहज बनवता येईल अशी मसूर डाळीची टिक्की/Masoor dal Tikki recipe
Siddhi food recipes Siddhi food recipes
300 subscribers
141 views
5

 Published On Sep 2, 2024

मसूर डाळीची टिक्की / सहज बनवता येईल अशी मसूर डाळीची टिक्की/Masoor dal Tikki recipe





कृती :-


मसूर डाळीची टिक्की बनवण्यासाठी एक वाटी अखंड मसूर डाळ घ्यावी ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी ,त्यानंतर ती शिजवुन घ्यावी ,त्याबरोबर एक बटाटा उकडुन घ्याव्या ,
शिजलेली डाळ मिक्सरला वाटून घ्यावी ,त्यामध्ये उकडलेला बटाटा किसून घालावा ,एक चमचा आला लसूण पेस्ट घालावी ,एक चमचा लाल तिखट घालावे,हळद घालावी ,अर्धा चमचा गरम मसाला घालावा,अर्धा चमचा लिंबाचा रस घालावा,छोटे चार चमचे ब्रेडचा चुरा घालावा,चवीनुसार मिठ घालावे,थोडी कोथिंबीर घालावी,हे सर्व मिक्स करून घ्यावे,
हाताला तेल लावून टिक्की बनवून घ्यावी ,दोन्ही बाजूने टिक्की ला बारीक रवा लावावा ,
गॅसवर पॅन गरम करून घ्यावे त्यावर टिक्की घालावी चमच्याने थोडे थोडे तेल घालून टिक्की शेकून घ्यावी व सॉस बरोबर खायला द्यावी.

आपली मसूर डाळीची टिक्की तयार आहे.

show more

Share/Embed