नर्मदा परिक्रमा - कृपा मैय्याची भाग १३ .. ब्रह्माण्ड घाट /हनुमान चालीसा /नवरात्रात सप्तशती वाचन
नर्मदा परिक्रमा . नर्मदा परिक्रमा .
2.54K subscribers
16,258 views
202

 Published On Jun 27, 2019

नर्मदे हर ... रिछावर गावात असताना मागील गावातून एक मुलगा आला. आम्ही पुढे निघताच तो आमचे सामान उचलू लागला. त्याला विचारले की तू कशासाठी आलास? तर तो म्हणाला की मला तुम्ही चहा पिऊन पुढे गेल्यावर माझे मन सांगू लागले की "जा यांच्या मागे आणि यांची सेवा कर. म्हणून मी आलो आहे. मला तुमचे सामान द्या. मी तुम्हाला मदत करायला आलो आहे. " बळे बळेच त्याने आमचे सामान घेतले. व आमच्याबरोबर चालू लागला. त्याला म्हणालो की तू कुठपर्यंत येणार आमच्याबरोबर? तो उत्तरला की "मेरा इस दुनियामे कोई नहीं है. मेरा घर नहीं है. मैं आपकी सेवा करते करते आपके घरतक आऊंगा." यावर आम्ही काही बोलूच शकलो नाही. दुपारी पंडित शिवमचे घरी गेलो असता, त्यांच्या घरातील सर्व मंडळी म्हणाली की तुम्ही याच्याबरोबर जाऊ नका. तो तरुण माणूस. तुम्हाला काही केले तर पत्ता लागणार नाही. भोजन झाल्यावर आम्ही निघालो. त्याला त्या घरातील लोकांनी पण सांगितले की तू परत तुझ्या घरी जा. यांचेबरोबर जाऊ नकोस. आम्हाला वाटले की आता तो जाईल. पण पुढे पण तो आमच्याबरोबर चालू लागला. रस्ता खूप अवघड होता. नंतर रेतीतून चालायचे होते. त्यामुळे चालायला खूप वेळ लागत होता. आमच्या बरोबरचे पाणी संपले. त्या मुलाने मैय्यातून दोन वेळा पाणी आणून दिले. मध्ये थोडी विश्रांती घेतली. व हिरापूर गावी पोहोचलो. दुपारी थांबलो होतो त्यांनी हिरापूर मध्ये कोणाला भेटायचे ते नाव सांगितले होते. त्यांना आम्ही भेटलो. ते त्यांच्या शेतातच होते. आम्हाला म्हणाले, रहा इथेच. पण तिथे दिवे नव्हते. येतील थोड्या वेळाने असे म्हणाले. तो गोठाच होता. पाणी पण नव्हते. वीज आली की पाणी येईल. भरपूर कचरा,
धूळ होती. तिथे कोणी रहात नव्हते. आम्ही त्यांना विचारले की एखादा आश्रम, मंदिर असेल तर सांगा. त्याने चौकशी केली. आश्रमाचे महाराज हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते. मग त्या गृहस्थाने आमची मुलाखत घ्यायला सुरवात केली. तुम्ही काय शिकलात?कुठे नोकरी करत होता? मुले किती? काय करतात? स्वतःचे घर आहे का? मुलाला पगार किती? इ.इ.... सर्व प्रश्न विचारून झाल्यावर आम्हाला त्यांच्या घरी नेले. त्यांची बायको मुले शिक्षणासाठी शहरात राहत होते. ते एकटेच शेती व उद्योगासाठी इथे राहात होते. त्यांच्या तीन राईस मिल्स होत्या. त्यांचे घरी गेल्यावर बाहेरची एक प्रशस्त खोली (गेस्ट रूम) आम्हाला दिली. ए.सी., गिझर, सोफा सेट अशा सर्व सोयी होत्या. दोन तीन नोकर चाकर होते. ते पाणी आणायला गेले तेव्हा आमच्या बरोबर असलेला मुलगा म्हणाला, मी आता जातो. मी या घरात पाणी सुद्धा पिणार नाही. व रहाणार पण नाही. जिथे अहंकार असतो तिथे मी नांही राहू शकत. आम्ही त्याला म्हणालो, अरे बाबा, आता अंधार पडला आहे. सकाळी जा. तो म्हणाला ... "मैं तो क्या, अभिक्का अभ्भी पहूंच जाऊंगा." आम्हाला यायला सात तास लागले तिथे तो लगेच पोहोचणार होता. पाणी पी म्हणाले तर म्हणतो ... मैय्या ... आपका झूठा पानी दे दो . वो पानी मैं पिऊंगा ... वो अभी पवित्र हुआ है. लेकिन इस घरका पाणी नहीं पिउंगा. पाणी पिऊन तो निघाला.
त्याला विचारले... तुझे नवा तरी सांग. तो म्हणाला .... "गोलू यादव. " मी विचारले की आप यादव याने भगवान श्रीकृष्ण के वंश के हो क्या? तो म्हणतो... हा हा ... वैसे ही समझो. बापरे... आमच्या अंगावर काटा आला. आम्ही त्याला तात्काळ नमस्कार केला. दक्षिणा दिली. व निरोप दिला.
बसगढी जवळ एक आश्रम होता. तिथे हरदा गावचे एक महाराज राहत होते. त्यांनी आम्हाला चहा दिला. समोर काही अंतरावर एक शीला (काळा दगड) २५/३० फूट उंच दिसत होती. त्या महाराजांनी सांगितले की ही शीला नर्मदा मैय्या पर्यंत खोल आहे. कितीही पाणी वाढले तरी तिची उंची वाढते. ती आजपर्यंत कधीही बुडाली नाही. पुढे कुटरई घाट येथे एक आश्रम आहे. तिथल्या महाराजांनी अर्जुन साल घालून चहा दिला.मालपूर येथील आश्रम पण खूप छान आहे. येथे मैय्याची मूर्ती खूपच सुंदर आहे. भैरवनाथ व महादेवाचे मंदिर आहे. प्रत्येक कल्पाचे मूर्ती दाखवून नाव लिहिलेआहे. ठाकूरजी व माताजी यांचे चित्रे भिंतीवर काढलेले आहे. येथील महाराजांचे नाव श्री. आनंद गिरी असे आहे. येथील घाटाचे नाव कन्हैया घाट असे आहे. मिरिया, पकरी - सोढा येथे निळकंठेश्वर मंदिर आहे. त्याला अमरकंटकचे प्रवेशद्वार म्हणतात. येथे साक्षात ब्रह्मदेवांनी तपश्चर्या केली होती. अमरकंटक ची परिक्रमा व नर्मदा परिक्रमा चे मार्ग येथे एकत्र येतात. येथे बारा ज्योतिर्लिंग स्थापन केली आहेत. गेली चौदा वर्षे येथे श्री. चेतनगिरी महाराज रहात आहेत. ते म्हणाले की दहा हजार लोक परिक्रमेला निघाले तर त्यातील फक्त दहा लोकांनाच या ठिकाणावर येण्याचे भाग्य लाभते. मैय्याकाठी असलेले खूपच रमणीय असे हे ठिकाणं आहे. इथून पुढचा रास्ता खूप अवघड होता. जंगलच होते. कुठेही भोजनप्रसादीची सोय नव्हती. दमगढ येथे पोहोचलो. पुढे अमरकंटकचा डोंगर सुरु होतो. ते पण गाव खूपच छोटे होते. आश्रम, मंदिर काहीच नव्हते. एक शाळा होती. तिथे मुक्काम होता. श्री. दिग्विजय सिंह यांचे बरोबर चा आमचा तो शेवटचा मुक्काम होता. दुसरे दिवशी अमरकंटकला पोहोचणार होतो. पुढे श्रीराम कुटी होती. त्या महाराजांनी बाहेरच पाटी लावली होती. माझे दार वाजवू नये. मी बाहेर असेल तरच भेटेन. त्यामुळे ते काही भेटले नाहीत. अमरकंटकचा डोंगर पण खूपच अवघड होता. श्री. तावसे यांचा पाय प्रचंड दुखत होता. पण "देह जावो अथवा राहो, पांडुरंगी लीन होवो" हे आठवून ते "पांडुरंग पांडुरंग" असा टाहो फोडत चालले होते. वाटेत रामदास महाराज भेटले. त्यांच्याबरोबर सत्संग करून पुढे कपिलधारा हे ठिकाण आले. पाय प्रचंड दुखत असता बऱ्याच पायऱ्या उतरून खाली गेलो व स्नान करून आलो. तिथे कपिल मुनींचा आश्रम आहे. त्यांनी येथे तपश्चर्या केली होती. आता अमरकंटक चार कि.मी. राहिले होते. कधी एकदा अमरकंटकला पोहोचतो असे झाले होते. नर्मदे हर . नर्मदा मैय्याकी जय.

show more

Share/Embed