"वीर गोगादेव जन्मोत्सव: पुणे में 27 अगस्त को भव्य आयोजन"
Express Line Express Line
1K subscribers
85 views
2

 Published On Aug 26, 2024

एस 18 फाउंडेशन ,ससून बेडा पंचायत, लष्कर बेडा पंचायत वॉर्ड शाखेतर्फे 27 ऑगस्ट 2024 रोजी पुण्यात वीर गोगादेव जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
पुणे - वाल्मीकी समाजाचे भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव (बागड) समारंभ उद्या, मंगळवार दि २७ ऑगस्ट रोजी रात्री ८ ते १० या वेळेत पुलगेट, गोगामेढी येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती एस 18 फाउंडेशन चे संस्थापक शैलेंद्र चव्हाण व ससून बेडा पंचायतचे जमदार नारायणजी बाबूजी चव्हाण, कविराज संघेलिया, ॲड आनंद चव्हाण, आणि अनिल जेधे यांनी पत्रकार परिषदेत दिली. लष्कर बेडा पंचायत या जन्मोत्सवाचे संयोजक असून यंदाच्या महोत्सवात चव्हाण कुटुंबप्रमुख नारायण बाबूजी चव्हाण हे परिवाराच्या वतीने भगवान वीर गोगादेवजी आणि माता सिरीयल यांच्या चरणी २ चांदीचे मुकुट, तलवार, भाला, चांदीचे पूजेचे ताट आणि पितळी समई, अर्पण करणार आहेत. या कार्यक्रमास काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे उपस्थित राहणार आहेत. यावेळी वीर गोगादेव यांची निशाण यात्रा ही काढण्यात येणार आहे.यावेळी लष्कर बेडा पंचायत समितीचे १२ सदस्यांचे सहपत्नी जोडीचे पोशाख व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करणार आहे. तसेच ३१ निशाण आखाड्याचे भगत यांचे स्वागत यांचे सत्कार सहपत्नी जोडीचे पोशाख व सन्मानचिन्ह देवून करणार आहे. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ५१ सहपत्नी जोडप्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी १५०० ते २००० लोकांसाठी एस 18 व इतर संघटना तर्फे गोगादेव भक्तांसाठी भोजनदान करण्यात येणार आहे.

show more

Share/Embed