महावस्त्र अर्पण सोहोळा गंगा दशहरा २०२२
VASUDEV SANGEET SABHA VASUDEV SANGEET SABHA
13.1K subscribers
3,816 views
177

 Published On Jun 14, 2022

🌸🌸🌸🌸🌸

महावस्त्र अर्पण सोहळा - गंगा दशहरा २०२२
श्री क्षेत्र ब्रम्हावर्त (बिठूर)...

पौराणिक ,ऐतिहासिक, अध्यात्मिक , अनेक साधकांची व सिद्धांची अधिष्ठात्री भूमी......

प. प.श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची राजधानी.....

दत्त संप्रदायातील वेदमंत्र अशा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जपाची जन्मभूमी......
थोरल्या स्वामी महाराजांचे चार चातुर्मास येथे गंगातिरी अंताजी पंतांच्या घाटावर झाले. महर्षी व्यासांनी अठरा पुराणांची रचना केली, त्यानंतर एकमेव पुरणाची रचना झाली ..*श्रीमद् दत्तपुराण* .. थोरल्या स्वामी महाराजांनी ही रचना याच स्थानी केली..... महाराजांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या या स्थानाचा... त्यांच्या कुटीचा जीर्णोद्धार वेद वासुदेव प्रतिष्ठान (पुणे- महाराष्ट्र ) या संस्थेने अध्यक्ष श्री अजित कृष्ण तूकदेव यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण केला आहे. या कुटीच्या परिसरात गंगा दशहराच्या पावन पर्वा वर
शिवसायुज्या ,अमृत तरंगा अशा गंगामाईच्या विग्रहाची स्थापना करण्यात आली . भव्य दिव्य गंगा दशहरा महोत्सव दि.31 मे ते 9 जून या कालावधीत साजरा करण्यात आला. या दरम्यान दि. आठ जून - ज्येष्ठ शुद्ध अष्टमी ला गंगामाई ला थोरल्या स्वामी महाराजांच्या वतीने कृज्ञतापूर्वक महावस्त्र अर्पण करण्यात आले. हर हर गंगे जय हर गंगे- नमामि गंगे या नामघोषात स्वामी महाराजांच्या कुटीपासून गंगा माईच्या दुसऱ्या तिरापर्यंत २५०० मीटर चे महावस्त्र पंचावन्न नावांच्या साहाय्याने गंगामाईला अर्पण केले....हा कार्यक्रम आपण ड्रोन द्वारे टिपला आहे.
ब्रम्हावर्त येथे पेशवे काळापासून मोठ्या प्रमाणावर साजरा होणाऱ्या गंगा दशहरा महोत्सवाचे मागील काही वर्षांतील हे मोठे आयोजन अतिशय मन:पूर्वक व भक्तियुक्त अंत:करणाने केले गेले . वेद वासुदेव प्रतिष्ठान च्या निमित्ताने महोत्सव पुनर्जीवित झाला... ज्याचे वर्णन केवळ शब्दातीत आहे... भाग्यानेच अशा क्षणांचे साक्षीदार होता आले... 🙏🙏

#dattaguru #dattatraya #vasudevsangeetsabha #वासुदेवसंगीतसभा #ganga #gangamata #gangariver #celebration #saveganga #cleanganga #गंगा #गंगाआरती #गंगा_नदी

show more

Share/Embed