Marathi Short Film (हावशा) HAAVSHA ... Innovative Films
Innovative Films Innovative Films
12.4K subscribers
4,420,158 views
12K

 Published On Jan 15, 2019

मराठी लघुपट "हावशा"

हावशा ही एका शेतकरी कुटुंबाची कथा आहे. त्यांच्याकडे शेतीसाठी एकच बैल असतो. व दूसरा बैल वारंगुळया वर घेऊन शेतीची काम केली जातात. पण त्यांचा बैल "हावशा" वय झाल्याने थकलेला असतो. त्यामुळे त्याच्याने काम होत नाही. त्यामुळे कुटुंब प्रमुख "नाना" हताश होतात. इतकी वर्ष ज्याने प्रामाणिकपणे कष्ट करून शेतीच्या कामात साथ दिली तोच आता वार्धक्याने त्रस्त झाल्याने ते दुखी होतात. नानांचा छोटा भाऊ ट्रॅक्टर घेण्यास मदत करतो. शेतीची काम ट्रॅक्टर वर होऊ लागतात पण नाना हावशाला या परिस्थितीत सोबत ठेवतात विकत नाहीत त्याची काळजी घेतात व आपली कृतज्ञता दर्शवितात. लोक जिथे म्हातारा बैल कसायाला विकतात तिथे नाना आणि त्यांचं कुटुंब त्याला घरातील सदस्य समजून त्याच्या म्हातारपणात त्याची काळजी घेतात.

इनोवेटिव्ह फिल्म्स

सदर चॅनल हे इनोवेटिव्ह फिल्म्स प्रॉडक्शन चे अधिकृत चॅनल आहे.
यावर इनोवेटिव्ह फिल्म्स द्वारे निर्मीत लघुपट, स्कीट, वेब सिरीज आणि डोक्युमेंटरि अपलोड करण्यात येतात.

- प्रसाद सावंत
Email : [email protected]
Contact : 095456 67432

show more

Share/Embed