जरांगे पाटील की पंकजा मुंडे कुणाच्या दसरा मेळाव्याला जास्त गर्दी | गर्दीची ही दृश्ये हादरवून टाकतील
S PRIME NEWS S PRIME NEWS
567K subscribers
213,614 views
1.6K

 Published On Oct 12, 2024

S PRIME NEWS
जरांगे पाटील की पंकजा मुंडे कुणाच्या दसरा मेळाव्याला जास्त गर्दी | गर्दीची ही दृश्ये तुम्हाला हादरवून टाकतील

लोकसभा निवडणुकीत सर्वात तुल्यबळ लढत झाली होती ती बीडमध्ये... अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढाईत बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव झालेला होता... पंकजताईंच्या पराभवामागे सर्वात मोठा फॅक्टर होता तो म्हणजे जरांगे फॅक्टर... त्यांचं जरांगे पाटलांचं आज बीडमधल्या नारायण गडावर दसरा मेळावा होता... तर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा हा नेहमीप्रमाणे भगवान गडावर आयोजित करण्यात आलेला होता... यातला आज दिवसभर सर्वात जास्त चर्चिला जाणारा प्रश्न म्हणजे कुणाच्या मेळाव्याला गर्दी जास्त होती तो... तर पाहुयात जरांगे आणि पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यातील नेमका फरक काय होतं तो... मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळावा हा तब्बल 900 एकरांवर वर होता... त्यामधील 200 एकर नुसतं पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आलेलं होतं... या ठिकाणी नारायण गडावर शंभरहून अधिक रुग्णवाहिका ताईतैनातनात ठेवण्यात आलेला होत्या... आज सकाळपासूनच राज्यभरातील मराठा कार्यकर्ते हे जरांगेंच्या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी बीडकडे निघालेले होते. नारायणगडापासून जवळपास 50 किलोमीटर लांब पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या... या ठिकाणी मराठा बांधवांकडून या उपस्थित राहणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी नाष्टा आणि पाण्याची सोय देखील करण्यात आलेली होती... तर या उलट पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा हा 300 एकरांवर आयोजित करण्यात आलेला होता.. त्यातल्या दोनशे एकरांवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली होती... पंकजाताईंच्या दसरा मेळाव्याच्या ठिकाणी तीन हेलिपॅड तयार करण्यात आलेले होते... धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघेही भगवानगडावर मेळाव्याला संबोधित करण्यासाठी हेलिकॉप्टरने आलेले होते... तर पंकजाताईंच्या मेळाव्याला सुजय विखे पाटील... तसेच लक्ष्मण हाके यांच्यासारखे नेतेमंडळी उपस्थित होती... तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यामध्ये एकटे मनोज जरांगे पाटील हेच आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार होते.... तसं पाहिल्यास पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला देखील लाखोंची गर्दी होती लोकसकाळ पासूनच पिवळे झेंडे आणि गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा असणारे बॅनर ठेवून भगवानगडावर उपस्थित होते... तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याला पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याहून पाचपट गर्दी जास्त असल्याच दिसून आलं... मनोज चरंगे पाटलांच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावण्यासाठी नारायणगडाकडचे सर्व रस्ते कार्यकर्त्यांनी गजबज होऊन गेले होते नारायण गडाकडे जाण्यासाठी चालत होता... 900 एकर मधील 200 एकर पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आलेल होत ते देखील जरांगे यांच्या कार्यकर्त्यांनी भरून गेलो होतो... एकूणच जरंगे पाटलांच्या दसरा मेळाव्याला उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी ही पाच लाखांच्या घरात असल्याचं बोललं जातय... तर पंकजाताईंच्या दसरा मेळाव्याला हीच गर्दी एक ते दीड लाखाच्या आसपास होती....

show more

Share/Embed