दापोलीत मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत केलेली मोंगा पार्टी / Monga Party / TF 01 vlogs/ dapoli
𝐀𝐚𝐩𝐚𝐧 𝐤𝐨𝐤𝐚𝐧𝐢 𝐦𝐚𝐧𝐚𝐬🌴🏝️ 𝐀𝐚𝐩𝐚𝐧 𝐤𝐨𝐤𝐚𝐧𝐢 𝐦𝐚𝐧𝐚𝐬🌴🏝️
273 subscribers
321 views
26

 Published On Feb 2, 2023

दापोलीत मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत केलेली मोंगा पार्टी / Monga Party / TF 01 vlogs/ dapoli

साहित्य:-
गावठी वालाच्या शेंगा ,भांबुर्डीचा पाला,चिरलेला कांदा,बटाटा सालासकट कापून ,अंडी,मसाला लावलेले चिकन, ओवा,जाडे मीठ, मातीचे मडके
__________________________________________________________________

बनविण्याची पद्धत :-
मातीचे मडके घ्या. त्यात तळाला भांबुर्डीच्या पाल्याचा थर लावा आणि मग त्यावर शेंगांचा थर लावा
त्यावर अंडी, बटाटे, कांदे आणि पुन्हा शेंगांचा थर लावा आणि मग जाडे मीठ आणि ओवा चवीनुसार पसरवा
पुन्हा त्यावर शेंगांचा थर लावा आणि इतर साहित्यही टाका, सर्व व्यवस्थित थर लागले की मडक्यातील सर्व पदार्थ नीट बसतील असे हलवून घ्या
त्यानंतर वरून भांबुर्डीच्या पाल्याने मडक्याचे तोंड बंद करा आणि तुम्ही चूल पेटवून त्यावर मडके ठेवा. मडके नसल्यास, तुम्ही पत्र्याच्य डब्याचाही वापर करू शकता. मात्र मातीच्या मडक्यात याची चव अधिक चांगली होते. चांगली धग लागण्यासाठी मडक्यावर गोणपाट टाका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मडक्याला सर्व बाजूने धग मिळण्याची गरज आहे
साधारण अर्धा ते पाऊण तास तुम्हाला हे ठेवावे लागते. पोपटी शिजली आहे की नाही हे कळण्यासाठी वरून पाण्याचे दोन – तीन थेंब टाकावे. लगेच गायब झाल्यास पोपटी शिजली असे समजण्यात येते
यानंतर मडके उचलून गोणपाटावर उलटे करावे आणि मग सर्व साहित्य काढून पटकन दडपवून घ्यावे
आता गरमागरम पोपटी खाण्यासाठी तयार.
______________________________________________________________________________________________________________________________________




#viral
#youtube
#शॉटवीडियो
#shorts
#youtobe
#yt

show more

Share/Embed