Harihar Fort - हरिहर किल्ला / harihar fort trek (climbing harihar fort)
spo bhramanti spo bhramanti
6.64K subscribers
4,877 views
261

 Published On Apr 21, 2023

Harihar Fort - हरिहर किल्ला / harihar fort trek (climbing harihar fort)

#hariharfort #hariharfortna shik #harihargad #forts #maharashtraforts #maharashtratourism #हरिहर #किल्ला

भारतामधील ट्रेकिंग साठी सर्वाधिक लोकप्रिय असणारा हरिहर गड हा नाशिक जिल्ह्यातील ब्रम्हगिरीच्या पश्चिमेस सुमारे २०किमी अंतरावर त्र्यंबकेश्वर पर्वतरांगेत (सह्याद्री) वसलेला गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे.दुरून जरी किल्ला आयताकृती दिसत असला तरी मुळात त्रिकोणी आकाराचा डोंगर आहे,
हरिहर गडाला हर्षगड म्हणून देखील ओळखलं जातं,गडाच्या पायथ्याशी हर्षवाडी नावाचं गाव आहे त्या गावाच्या नावावरूनच बहुतेक गडाला हर्षगड नाव पडलं असावं.

गडाचा इतिहास :-
प्राचीन हरिहर गडाची स्थापना ९-१४ व्या शतका दरम्यान यादवांच्या काळात झालेली असावी,यादवांनी या गडाची स्थापना प्राचीन गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी केल्याचं आपल्याला इतिहासात समजतं.
गडाच्या स्थापनेपासून गड इंग्रजांच्या ताब्यात जाई पर्यंत या गडाने खूप आक्रमणे झेलली तसेच खूप मालक्या अनुभवल्या,सुरुवातीला हरिहरगड निजामांच्या ताब्यात होता पण पुढे १६३६ मध्ये शहाजीराजेंना त्र्यंबकगड घेताना हा गाद देखील जिंकून घेतला, नंतर गड मोघलांकडे गेला, नंतर पुन्हा मोरोपंत पिंगळेंनी गड मराठेशाहीत आणला,पुन्हा मोघल आणि पुढे १८१८ मध्ये इंग्रज आणि सद्द्यस्तिथीला भारत सरकार असा या गडाचा प्रवास!

हरिहर गडावर कसे यायचे?
पर्याय १)हरिहर गडावर यायचं झाल्यास नाशिक बस स्थानकावरून घोटी किव्वा खोडाळ्याला जाणारी बस पकडावी,त्या बसने निरगुडपाडा किव्वा कोटमवाडी गावांपर्यंत यावे जे या गडाचे पायथा गावं आहेत.

पर्याय २) जर तुम्ही त्र्यंबकेश्वर मार्गाने येणार असाल तर मोखाडा मार्गावर हर्षेवाडी फाट्यावर उतरून तेथून ४किमी अंतरावर हर्षेवाडी गावात यावं जो या गडाचा पायथा गाव आहे.

पर्याय ३) मुंबई वरून यायचं झाल्यास कसाऱ्यावरून खोडाळा मार्गाने निरगुडपाडा गावापाशी यावे
मुंबई - कसारा - खोडाळा - निरगुडपाडा

हर्षेवाडी,कोटमवाडी,निरगुडपाडा या तीनही गावातून हरिहर गड अगदी सारख्या अंतरावर आहे,या पायथा गावांपासून १-१.३० तासांच्या पायपिटीनंतर तुम्ही गडाच्या पठारी भागापर्यंत जाऊन पोहचता.

टीप :१)गडावर येताना पिण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी सोबत घेऊन यावे.
२)स्वतःची काळजी घेत असताना गडाचं पावित्र्य राखायची काळजी देखील घ्यावी हि नम्र विनंती.
धन्यवाद...जय शिवराय..!

Contact Us :
instagram : www.instagram.com/spo_bhramanti/
gmail : [email protected]
Videography By : Pratham Desale.
Logo Designed by : Pankaj Harad @prhstudio
Special Thanks : Rohan Chaudhari,Pratham Desale,Sushil Pote,Pratik Ratambe,Pankaj Harad & all team.

harihar fort
harihar fort accident
harihar fort history
harihar fort in monsoon
harihar fort in rainy season
harihar fort maharashtra
harihar fort nashik
harihar fort nashik maharashtra
harihar fort nashik maharashtra india
harihar fort stairs
harihar fort status
harihar fort trek
harihar fort trek in monsoon
harihar fort trekking
harihar fort vlog
harihar killa
how to go to harihar fort
nashik harihar fort
trek to harihar fort80° Vertically Inclined Trekharihar gad fort

show more

Share/Embed