कुरकुरीत मूग डाळ ची भजी/पावसाळ्यासाठी snacks recipe/crispy moong dal pakoda
Siddhi food recipes Siddhi food recipes
300 subscribers
580 views
12

 Published On Jul 24, 2024

कुरकुरीत मूग डाळ ची भजी/पावसाळ्यासाठी snacks recipe/crispy moong dal pakoda





कृती :-

मूग डाळ भजी बनवण्यासाठी एक वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून दोन ते तीन तास पाणी घालून भिजत घालावी
डाळ चांगली भिजल्या नंतर त्यातील पाणी काढून टाकावे , एका वाटीत दोन चमचे डाळ बाजूला काढून घ्यावी आणि बाकीची डाळ पाणी न घालता मिक्सर मध्ये थोडी जाडसर वाटून घ्यावी वाटताना त्यात दोन हिरव्या मिरच्या घालाव्या वाटलेली डाळ एका भांड्यात काढावी त्यात बाजूला ठेवलेली डाळ घालावी,चार ते पाच कडीपत्ता ची पाने चिरून घालावी ,चार पाच पाकळ्या लसुण व अर्धा इंच आला किसून घालावा ,थोडी कोथिंबीर घालावी ,चवीनुसार मीठ घालावे ,अर्धा चमचा धने पूड घालावी ,थोडीशी हळद व हिंग घालावी व सर्व मिक्स करून घ्यावे दोन मिनिट फेटून घ्यावे.
मिडीयम गॅसवर एका कढईत तेल गरम करून घ्यावे त्यात पाण्याचा हात लावून भजी सोडावी व बदामी रंगावर तळून घ्यावी,पुदिन्याची चटणी किंवा नारळाची चटणी किंवा सॉस बरोबर खायला द्यावी .

आपली कुरकुरीत मुगडाळ भजी तयार आहे .

show more

Share/Embed