Ashane Waterfall - Best waterfall near Mumbai
Livingwithsayeli Livingwithsayeli
1.12K subscribers
989 views
84

 Published On Jul 8, 2022

हिरवागार डोंगर आणि त्याच्या कुशीतून झेपावणारा दुधाळ धबधबा अंगावर झेलत तरुणाई अगदी पावसोत्सवच साजरा करत असते.. कर्जतजवळील आषाणे धबधबा हा सध्या तरुणाईचे लाडके पर्यटनस्थळ झालेले आहे. उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याच्या पाण्यात आंनद साजरा करून तरुणाई अगदी ओलीचिंब होऊन जाते.
कर्जत रेल्वे स्थानकाच्या अलीकडच्या भिवपुरी स्थानकापासून काही किलोमीटर अंतरावर आषाणे धबधबा आहे. भिवपुरी स्थानकापासून केवळ अध्र्या तासात धबधब्यापर्यंत पोहोचता येते. पण जाणारा रस्ता आणि सभोवतालचा परिसर हिरवागार आणि वातावरण आल्हाददायक.. मग या धबधब्यापर्यंतचा प्रवासच मन उल्हसित करणारा आणि उत्साह वाढवणारा. अधूनमधून रिमझिमणारा पाऊस, हिरवा मखमली अंगरखा परिधान केलेले डोंगर, हिरवीगार भातखाचरे आणि शेताच्या मधून जाणारी पायवाट.. हा रस्ता संपूच नये असे वाटते. पण दूर डोंगरात फेसाळणारा धबधबा आपल्याला खुणावत असतो आणि आपली पावले झरझर धबधब्याच्या दिशेने चालायला लागतात.

जसा जसा डोंगर जवळ येतो, तसतसे अनेक ठिकाणी धबधबे दिसायला लागतात. पण आषाणे गावातील मोठा धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण. या धबधब्याच्या ठिकाणी जाण्यासाठी थोडी डोंगरचढाई करावी लागते. धबधब्याच्या ठिकाणी पोहोचले की मोकळ्या जागेत उंचावरून कोसळणाऱ्या या धबधब्याचे पाणी झेलताना खूपच आनंददायी वाटते, पण तेवढेच भीतीदायक. धबधब्याच्या पाण्याचा मारा झेलताना समोरचे काही दिसत नाही, दोन क्षण पाणी अंगावर झेलले की त्यातून बाहेर पडावे वाटते.. पण पुन्हा हा धबधबा कवेत घ्यावासा वाटतो. या दुधाळ धबधब्याच्या ठिकाणी नाचावेसे, बागडावेसे प्रत्येक पर्यटकाला वाटते, तेथून पायच निघत नाही.
या धबधब्याचा ओहोळ अगदी दीड ते दोन किलोमीटपर्यंत पसरलेला आहे. या खळखळत्या ओहोळातही यथोचित डुंबायला आणि ओलेचिंब व्हायला पर्यटकांना आवडते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून आषाणे धबधबा पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ बनत आहे.


   • How to Reach Morbe dam- Morbe Dam Vlog   - Morbe Dam

Instagram- https://instagram.com/sayeli_jadhav?i...

#ashanewaterfall #bhivpuriwaterfall #waterfallnearmumbai #karjatwaterfall #waterfallsnearmumbai #bestwaterfallnearmumbai #hiddenwaterfallnearmumbai #secretwaterfallnearmumbai #secretwaterfall #devkund #beautifulwaterfallnearmumbai #travelvlog #livingwithsayeli

show more

Share/Embed