राजश्री शाहू प्रतिष्ठान ढोल ताशा पथक | Rajashri Shahu Pratisthan Pathak| Pune Ganapati Visarjan
Sahyadri Wanderer Sahyadri Wanderer
708 subscribers
575 views
20

 Published On Sep 13, 2019

ढोल–ताशा पथक म्हटले की, सगळ्यांना आठवतो तो पुण्याचा गणेशोत्सव.  पण हल्ली हे समीकरण केवळ पुण्यापुरतं मर्यादित न राहता, हे ढोल-ताशाचे लोण हळूहळू सर्व महाराष्ट्रात पसरु लागलंय, फोफावू लागलंय.  आणि का फोफावू नये ?  महाराष्ट्रातील मातीतील, शिवरायांच्या इतिहासाशी नाळ जोडणारं, महाराष्ट्राच्या संस्कृतीत वाढलेलं एक वाद्य महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या भारतात वाजू लागलं, तर त्या बिघडलं कुठं ?

                        ढोल-ताशा ही दोन्ही वाद्ये महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा जपणारी वाद्यं आहेत.  ही वाद्ये शिवरायांच्या स्वराज्यात विजयी मिरवणुका व सणवारांना मावळ्यांकडून वाजवली जात असतं.  म्हणून काही ठिकाणी यांना मावळ ढोल-ताशे असं म्हटलं जात असावं.  रणांगणामध्ये वीरांना लढण्यासाठी स्फूर्ती देण्यासाठी रणंवाद्यं म्हणून देखील ही वाद्ये वाजवली जात असल्याबाबतच्या नोंदी इतिहासाची पान चाळल्यावर आढळून येतात.

            महाराष्ट्रात ढोल-ताशांची परंपरा जिवंत ठेवण्यामध्ये पुणे शहरातील ढोल-ताशा पथकांचा मोलाचा वाटा आहे.  आज महाराष्ट्राला याच पथकांमुळे ढोल-ताशाची भुरळ पाडली आहे, असं म्हटलं तर वावग ठरु नये.

show more

Share/Embed