हर घर तिरंगा उत्सव १३ ऑगस्ट २०२४
Shikalgar Sir PVD Paluskar Shikalgar Sir PVD Paluskar
670 subscribers
49 views
2

 Published On Sep 18, 2024

*बुधवार दि.13आँगस्ट 2024*...🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*पलूसकर शैक्षणिक संकुलात हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत ध्वजपूजन,ध्वजारोहण समारंभ,तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात*🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*आपल्या पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शैक्षणिक संकुलात हर घर तिरंगा अभियानांतर्गत ध्वजपूजन,ध्वजारोहण समारंभ, तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली. .ध्वजपूजन संस्थेचे सचिव मा.जयंतीलाल शहा साहेब उपाध्यक्ष विश्वास रावळ( भाऊ) संचालक संजय परांजपे दादा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी जेष्ट शिक्षक ए.जे.सावंत सर,बी.एन.पोतदार, बी.डी.चोपडे, यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते*..🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी ध्वजगीत, महाराष्ट्र गीत,समूहगीत सादर केले.
यावेळी संस्थेचे सचिव जयंतीलाल शहा साहेब यांनी आपल्या मनोगतातून सर्वांना शुभेच्छा दिल्या.सुञसंचालन बी. एन पोतदार यांनी केले.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
हर घर तिरंगा अभियान अंतर्गत शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष उदय परांजपे साहेब ,सर्व संचालक मुख्याध्यापक टी .जे.करांडे (सर), यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. संयोजन सांस्कृतिक विभागप्रमुख ,बी.डी.चोपडे,एस.डी.सावंत,एस.एन.गस्ते , जे.ए.सुवासे, सौ. पी व्ही नरुले, यांच्यासह प्राथमिक माध्यमिक व ज्युनियर विभागातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना हर घर तिरंगा अभियान राबवण्याचे आवाहन केले.🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

यावर्षी देशाच्या स्वातंत्र्यदिनाला 77वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक नागरिकांनी, वीरांनी आपले बलिदान देऊन स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिले. नागरीकांच्या मनामध्ये स्वातंत्र्यलढयाच्या स्मृती तेवत राहाव्यात. या लढ्यातील क्रांतीकारक तसेच अज्ञात नायकांचे स्मरण व्हावे.प्रखर देशभक्तीची भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी. या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत हर घर झेंडा हा उपक्रम राबविण्यात येत आहे..


🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💐🇳🇪🌸🇮🇳

show more

Share/Embed