Kukdeshwar Temple - कुकडेश्वर मंदिर - Junnar
Travel IJ Travel IJ
9.31K subscribers
8,642 views
112

 Published On Oct 18, 2018

Kukdeshwar Temple Junnar - कुकडेश्वर मंदिर

#Kukdeshwartemple #kukadiRivarOrigin #Kukdeshwar

आज आपण जात आहोत, जुन्नर शहरापासून २० कि.मी डोंगराच्या कुशीत वसलेल्या पूर या गावी. त्या ठिकाणी कुकडी नदीचा उगम होतो. तेथे प्राचीन हेमाडपंथी पांडवकालीन मंदिर आहे हे मंदिर दगडांवर दगड रचून तयार केलेले आहे. मंदिरावर असलेले कोरीव काम पाहण्यासारखे आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर बांधताना कोणत्याही प्रकारच्या मिश्रणाचा (सिमेंट-चुना) उपयोग केलेला नाही. पण या मंदिराला कळस नाही. हे मंदिर इ.स पूर्व ११०० ते १२०० वर्षापूर्वीचे आहे असे स्थानिक रहिवाश्यांकडून कळते. हे मंदिराचा मुख पश्चिम दिशेला असल्यामुळे मंदिरात अंधार जाणवतो, पण विजेच्या दिव्यांमुळे मंदिरात प्रकाश असतो. तेथे महादेवाचे शिवलिंग आहे. श्रावण महिन्यात या ठिकाणी भाविकांची गर्दी होते. पावसाळ्यामध्ये या ठिकाणचे दुर्श्य पाहण्यासारखे असते कारण मागेच डोंगर असल्यामुळे त्यावरून वाहणारे पांढरेशुभ्र धबधबे आकर्षित करून घेतात. याच ठिकाणी कुकडी नदीचा उगम होत असल्यामुळे या क्षेत्राला कुकडेश्वर असे नाव पडले. कुकडी नदीचा या ठिकाणी उगम होऊन पुढे ती माणिकडोह धरणाला मिळते व पुढे वाहत जाऊन ओझरहुन येडगाव धरणाला मिळते, तेथून पुढे जाऊन निघोज कुंडापासून शिरूर तालुक्यात घोडनदीला जाऊन मिळते. स्थानिक रहिवाश्यांच्या माहितीनुसार नदीचा होणारा उगम मागे असलेल्या डोंगरामध्ये एका गुहेत झाला आहे असे कळते. त्या गुहेमध्ये भगवान शंकरांची कोरलेली मूर्ती आहे आणि त्या मूर्तीमध्ये भगवान शंकरांच्या जटेमधून पाण्याची सुरवात होते आणि खरा उगम त्याच ठिकाणी झाला असे स्थानिक लोकांकडून कळते.

मग कधी भेट देताय कुकडेश्वर मंदिराला आणि कुकडी नदीच्या उगमाला ?

तुम्हाला जर या ठिकाणाला भेट देण्याची इच्छा असेल तर, तुमच्या सोयीसाठी मी मॅप ची लिंक खाली देत आहे तिची मदत घ्या.

तुम्हाला जर अश्याच नवीन ठिकाणांची माहिती घ्यायाची असेल तर आपल्या चॅनेल ला सबस्क्राइब करायला विसरू नका. तुम्हाला जर काही मदत लागली तर तुम्ही मला आपल्या इंस्ट्राग्राम ( Travelij_ ) किंवा फेसबुक ( Travel IJ ) च्या पेज वर मॅसेज करू शकता मी नक्कीच माहिती देऊ शकेल.

GEAR I USE TO MAKE MY VIDEOS

Canon DSLR with Lens EF-S 18-55mm - https://amzn.to/3xhgMzg
Memory Card For DSLR - https://amzn.to/3xhgMzg
Action Camera - https://amzn.to/366aard
Redmi Note 10 - https://amzn.to/3AkUsqc
Gimbal For Mobile - https://amzn.to/2UVVlVT
2nd Action Camera - https://amzn.to/3hwGn0a
Action Camera Accessories - https://amzn.to/2SGsXX4
GoPro Dual Battery Charger - https://amzn.to/3qGpWCN
Monopod For DSLR and Action Camera - https://amzn.to/3wjtmwE

-------------How to Reach-------------

लिंक - https://bit.ly/2CNqqkt

----------------------------------------

MUSIC CREDITS:
Bensound: https://www.bensound.com/royalty-free...

----------------------------------------------------
Subscribe to Travel IJ : https://bit.ly/2NT4qK2
Like us on Facebook:   / travelij  
Follow us on Instagram:   / travelij_  
Hit LIKE and SUBSCRIBE !

Thank you for watching! If you enjoyed, please SUBSCRIBE us!

show more

Share/Embed