अल्टिमेट फाइटिंग चॅम्पियन' पूजा तोमरकडून फिटर(FITTR) संस्थेला विजयाचे श्रेय
Express Line Express Line
982 subscribers
45 views
1

 Published On Jul 10, 2024

अल्टिमेट फाइटिंग चॅम्पियन' पूजा तोमरकडून फिटर(FITTR) संस्थेला विजयाचे श्रेय

पुणे, १० जुलै, २०२४ - 'अल्टिमेट फाइटिंग चॅम्पियन' होणारी पहिली भारतीय महिला पूजा तोमर ही आता अष्टकोन रिंगमध्ये आणि रिंगबाहेरही अतुलनीय प्रवास करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या कामगिरीमुळे युवा पिढीला प्रेरणा मिळणार आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला‌ लुईव्हिल (अमेरिका) येथे अल्टिमेट फाइटिंग चॅम्पियनशिप (UFC) मधये मिक्स्ड मार्शल आर्ट्स (MMA) फायटर पूजा तोमर हिने विजेतेपदपटकावीत ऐतिहासिक कामगिरी केली. हे विजेतेपद पटकावणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू आहे. तिने यूएफसी(UFC)मधील तिचे अनुभव सांगताना फिटर(FITTR) या आघाडीच्या ऑनलाइन फिटनेस आणि न्यूट्रिशन प्लॅटफॉर्मचे आभार मानले. या संस्थेने तिला UFC गौरवाचे स्वप्न साकार करण्यात मदत केली.

पूजा तोमर यावेळी म्हणाली की, “यूएफसी मधील माझा प्रवास आनंददायी आणि आव्हानात्मक नव्हता. मला आशा आहे की माझी कथा इतरांना मिश्र मार्शल आर्ट्सच्या जगात त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास प्रेरित करेल. भारताला जागतिक स्तरावर अधिक खेळाडूंची गरज आहे आणि आशा आहे की, माझा विजय अधिकाधिक तरुणांना आणि त्यांच्या पालकांना खेळाला करिअर म्हणून स्वीकारण्याची प्रेरणा देईल".

“पूजा तोमरचे विजेतेपद जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. तिचे समर्पण, चिकाटी आणि अपवादात्मक प्रतिभेने भारतातील अनेक तरुण लढवय्यांसाठी मार्ग मोकळा केला आहे”, असे फिटर(FITTR)चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जितेंद्र चोक्सी यांनी सांगितले.

show more

Share/Embed