एक वेगळी वारी कुसुमवत्सल्य फाऊंडेशन आणि *प्रकाशवाट सामाजिक बांधिलकी ट्रस्ट,पुणे यांची
Express Line Express Line
982 subscribers
113 views
2

 Published On Jul 3, 2024

एक वेगळी वारी कुसुमवत्सल्य फाऊंडेशन आणि *प्रकाशवाट सामाजिक बांधिलकी ट्रस्ट,पुणे यांची

सोमवार दिनांक ०१ जुलै २०२४ रोजी सकाळी ..

अशी झाली वारीची सुरुवात.. कुसुम वत्सल फाऊंडेशन च्या स्लोगन प्रमाणे.. जिथे कमी तिथं आम्ही.
आज पुण्यात वारकऱ्यांची सेवा गल्ली बोळात.. घरोघरी होत आहे.. पण दूरवर दुर्गम भागात कातकरी, आदिवासी समाजाच्या मुलांना साधे अंगभर कपडे हि नाहीत. रोजच्या खाण्या पिण्याची पण भ्रांत आणि शिक्षणाची वणवण. अशा परिस्थितीत या मुलांना बिस्कीट, केक ईत्यादी खाऊ बघून तुटून पडले त्यातही चेहरे आनंदाने फुलून आले .. आणि हि बाळ गोपाळा ची सेवा विठू चरणी वाहिली.. मुलांना फक्त खाऊ नाहीतर त्यांना खेळायला.. फुटबॉल. बॅटबॉल.कॅरम, सापसीडी ईत्यादी खेळणी मुलांना शाळेची गोडी लागावी म्हणून देण्यात आली. पावसापासून रक्षण होण्यास रेनकोट दिले. हि लेकरे भिजू नये.आजारी पडू नये हीच यामागे भावना. फालभाज्यांची रोप बिया दिल्यात.. कारण परसबाग जोपासायला शिकतील आणि घरच्या घरीच निदान भाजी पिकवायला सुरवात करतील. निसर्गाचे संवर्धन पण होईल अशीच यामागची कल्पना.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कातवडी, ग्रामपंचायत डावजे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. साधारण आता प्रयन्त 1 हजार मुलांना शिक्षणासाठी मदत.मुलामुलींना वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल ईत्यादी शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
कुसुमवत्सल्य फाऊंडेशन चे सर्वेसर्वा सौ. वैशाली पाटील मॅडम आणि टीम..मनीषा समर्थ, मनीषा गिरमे, अर्चना कल्याणी, चांदणी तांदळे, कृपाली गावडे,वृषाली सुर्यवंशी, वैशाली जगदाळे,अंजली चव्हाण, शुभदा केळकर,छाया सपकाळ,उषा ननावरे,मिलन पवार,विलास राठोड,विजय जगदाळे, विकास कडू पाटील,बाळासाहेब पोकळे, अंनता दळवी, इंद्रजित डोंगरे, प्रकाश गरुड.स्वप्नील शिंदे,सागर चोरगे,राहुल कडूपाटील,यांनी या कार्यक्रम संपन्न करण्यासाठी प्रयत्न केले. अशी ही वारी विठ्ठल चरणी अर्पण...

show more

Share/Embed