Pawankhind | पावनखिंड | विशाळगड|
Ajinkya Travelogue Ajinkya Travelogue
2.32K subscribers
35,229 views
1K

 Published On Feb 22, 2022

#pawankhind #chatrapatishivajimaharaj #bajiprabhudeshpande

छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्दी जोहरचा वेढा फोडून विशाळगडावर सुखरूप जाणे ही घटना अत्यंत वेगवान, धाडसी आणि युद्ध कौशल्याचा प्रमाण बिंदू ठरली असली तरी सिद्दी जोहरचा पन्हाळगड वेढा ही मात्र अचानक घडलेली घटना नक्कीच नव्हती. याच्याकडे दक्षिण भारतात १६५२ पासून घडत आलेल्या अनेक घटनांचा परिणाम म्हणून पाहिले जाते. आदिलशाहीविरुद्ध स्वराज्य यातील राजकीय संबंधांचा तो परिणाम आहे.

१२ जुलै १६६०च्या रात्री पन्हाळगडावर घडलेला प्रसंग हा भारताच्या इतिहासात अतिशय महत्वपूर्ण होता. दक्षिण भारत आणि एकंदरीतच संपूर्ण भारताच्या राजकारणावर प्रभावशाली ठरणारी ही रात्र शिवरायांच्या पन्हाळगड येथील प्रवासाने सुरू होऊन विशाळगड प्रवासाने पूर्ण झाली. ही घटना महाराष्ट्राच्या ऐतिहासिक कालपटात रोमांचक आणि दैदिप्यमान आहे. शिवरायांच्या वैयक्तिक आयुष्याचा धाडसी पैलू स्पष्ट करणारी आहे आणि स्वराज्याच्या दृष्टीने प्रचंड अभिमानाची आणि गौरवशाली आहे. कारण याच रात्री छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडला वेढा देऊन बसलेल्या सिद्धी जोहरच्या तावडीतून सुटून विशाळगडावर सुखरूप पोहोचले आणि वाटेत घडला तो पावनखिंडीचा रणसंग्राम.


©AjinkyaTravelogue

#पावनखिंड #विशाळगड #vishalgadh #pawankhindtrailer #bajiprabhudeshpande #history #chatrapati #shivajimaharaj #documentry #pawankhindmovie #pawankhindbattle #ghodkhindpawankhindreviewpawankhindposterbajiprabhu Deshpande300moviepawankhindsongpawankhind officialpawankhindteampawankhindstatus

show more

Share/Embed