#03
URJA VEDH URJA VEDH
3.35K subscribers
16,391 views
228

 Published On Feb 6, 2023

संत वचनामृत मंडळ नांदेड यांचा थोर उपक्रम म्हणजे नारद भक्तीसूत्र प्रबोधन मालिका.
तिसरा दिवस..
मनुष्याला जन्म का मिळाला तर त्याने विविध पद्धतीने भगवंताची भक्ती करावी आणि त्याची प्राप्ती करावी यासाठी. भक्ती कशी पाहिजे तर ती परम पाहिजे.. लोकांना दिसेल अशी नको.. दाखवायची नको तर ती प्रामाणिक, संपूर्ण समर्पित पाहिजे हे सांगतांना आज महाराजांनी राजपुत्र कंडप्पा याच्या भक्तीचे उदाहरण दिले आणि ती गोष्ट सांगत भक्ती किती आणि कशी असावी हे सांगितले.
सद्गुरू चंद्र शेखर महाराज यांची रसाळ वाणी मध्येच त्यांनी दाखवलेला करुण रस .. त्यात चिंब भिजणारे श्रोते हे सर्व विलक्षण आहे. प्रत्येक संस्कृत श्लोकातील प्रत्येक शब्दाचा सहज अर्थ समजाऊन सांगत महाराज विषयाच्या तळापर्यन्त नेतात हा अनुभव पदोपदी येतो.. दुर्योधन आणि श्री कृष्ण आणि विदुर आणि श्री कृष्ण यांच्यातील भक्ती भावाचा संबंध समजाऊन सांगतांना महाराजांनी कधी महाभारतात नेल हे कळल नाही.
भक्ती मार्ग सोपा ही आहे आणि कठीण ही पण हे सर्व आपल्या भावावर अवलंबून आहे.. पण हा जन्म परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आहे आणि ही संधी भक्ती मार्गाने गेल्यावर मिळते हे मात्र मनावर पक्क बिंबल आहे
ज्यांना येणे जमले नाही त्यांच्यासाठी youtube वर हे तिन्ही दिवसाचे विडियो आहेत.. शांतपणे पहा आणि चिंतन करा .

show more

Share/Embed