शिवाजी महाराजांच्या काळापासून ओळख असलेली कला:बहुरूपी रायरंद,बहुरूपी Rayrand
Gramwarta Express Gramwarta Express
42.3K subscribers
458,779 views
1.8K

 Published On Mar 3, 2020

शिवाजी महाराजांच्या काळापासून ओळख असलेली कला:बहुरूपी रायरंद,बहुरूपी Rayrand
रायरंद तथा बहूरुपी ! महाराष्ट्रातील डोंबारी, वासुदेव, नंदीवाले,पांगुळ,मसनजोगी अशा लोककलाकारांपैकी एक असणारे हे बहूरुपी रायरंद.पोलिसांसारखी खाकी वर्दी,डोक्यावर टोपी,एका हातात काठी,बगलात डायरी,गळ्यात पिशवी टाकून व शिट्टी वाजवत गावोगाव फिरणारे रायरंद लहानांपासून मोठ्यां माणसापर्यंत सर्वांच्या आकर्षणाचा विषय ! त्यांच्या विनोदीशैलीतील भाष्यात ते सासू-सून,सासरवाडी,लग्न सोहळे,पोलीसकेस,व्यसनमुक्ती,हुंडाबंदी आदी सामाजिक विषयांवर भाष्य करत लोकांना खळखळून हसवत,मनोरंजन करत गावोगावी फिरत आपली उपजीविका भागवतात.

शिवाजी महाराजांच्या काळापासून ओळख असलेली ही बहुरूपी कला
काळाच्या ओघात इतर लोककलांप्रमाणेच लोप पावत चालली आहे.उदरनिर्वाहासाठी या कलाकारांनी आता दुसरे मार्ग शोधले आहेत.भविष्यात आता ही कला आपल्याला फक्त अशाच समाजमाध्यमांवर पहायला मिळेल,अन् उरतील फक्त जुन्या आठवणी !



महाराष्ट्राची लोककला
बहुरूपी रायरंद
ग्रामवार्ता एक्सप्रेस
Gramwarta express

show more

Share/Embed