Raj Thackeray आणि एकनाथ शिंदेंचं का जमेना? मनसे फॅक्टर महाराष्ट्रात कुणाकुणाचं गणित अवघड करणार?
Mumbai Tak Mumbai Tak
3.89M subscribers
10,319 views
237

 Published On Oct 11, 2024

#rajthackeray #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
दसरा मेळाव्यांचा माहोल सुरु असताना आणि विधानसभेच्या निवडणुका कुठल्याही क्षणी घोषित होतील अशी परिस्थिती असताना राज ठाकरेंचं मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह होणं बरंच काही सांगून जाणारं आहे. राज ठाकरेंची आज पेपरला आलेली आणि बरंच काही सांगून जाणारी जाहिरात. त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी राज ठाकरेंचा एक पॉडकास्ट प्रसारित होणार आहे. याची देखील मोठी चर्चा आहे. लोकसभेला जरी मोदींचं नाव घेत महायुतीला राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी लोकसभेनंतर मात्र राज ठाकरेंचा मूड बदलला आहे. विधानसभेला मनसे पूर्ण ताकदीनं मैदानात उतरेल असं एकंदरीत दिसून येतंय. त्यामुळं लोकसभेला पाठींबा दिल्यानंतर आता राज युतीतून बाहेर जाण्याची ऑफिशियल घोषणा कधी करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता ठाकरे सरकारला वारंवार निशाण्यावर घेत असल्याचं देखील घेत आहेत. त्यामुळं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना खासकरुन हे अडचणीचं ठरणार आहे. ठाकरेंच्या भूमिकेनं शिंदेंना नेमका काय फटका बसणार? शिंदे आणि राज ठाकरेंचं का जमत नाहीय याचा उहापोह करण्याचा प्रयत्न या व्हिडीओच्या माध्यमातून करुयात.

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

show more

Share/Embed