बटाटा लागवड संपूर्ण माहिती | batata lagwad kontya mahinyat karavi |
BharatAgri Marathi BharatAgri Marathi
177K subscribers
11,448 views
205

 Published On Nov 25, 2023

▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!

👉लिंक - https://krushidukan.bharatagri.com/

====================================================================

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱 भारतअ‍ॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.

आजचा विषय - 🌱बटाटा लागवड संपूर्ण माहिती | batata lagwad kontya mahinyat karavi | #potato #batata #farming👍

बटाटा हे कंद वर्गीय प्रमुख भाजीपाला पीक आहे. बटाटा पिकाचे लागवड पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, बीड, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यात केली जाते. बटाटा हे कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारे पीक असून या पिकाला योग्य तसेच नियोजित पद्धतीने लागवड केल्यास कमी कालावधीमध्ये अधिक पैसे मिळवून देणारे पीक ठरू शकते.

👉लागवड कालावधी - बटाट्याची लागवड खरीप हंगामात जून, जुलै महिन्यात करतात व रब्बी हंगामात ऑक्टोंबर, नोव्हेंबर महिन्यात करतात.

👉बटाटा जाती -
1. कुफरी लवकर - ही ६५ ते ८० दिवसात तयार होणारी जात असून खरीप व रब्बी हंगामात घेतली जाते. या जातीचे बटाटे पांढरे शुभ्र आकर्षक व मोठे असतात. या जातीचा बटाटा साठवणुकीत चांगला टिकतो. एकरी उत्पादन ८० ते १०० क्विंटल असते.
2. कुफरी चंद्रमुखी - ही जात ९० ते १०० दिवसात तयार होते. या जातीचे बटाटे लांबट गोल व फिकट पांढरे असतात. साठवणुकीस ही जात उत्तम आहे. एकरी उत्पादन १०० क्विंटल पर्यंत मिळते.
3. कुफरी सिंदुरी - ही जात १२० ते १३५ दिवसात तयार होते. या जातीचा रंग फिकट तांबडा असून बटाटे मध्यम व गोल आकारचे असतात. ही जात साठवणुकीस उत्तम आहे. एकरी उत्पादन १२० क्विंटल पर्यंत मिळते.

👉बटाटा बीज प्रक्रिया -
1. बियाणे उत्तम दर्जाचे असावे. एकरी ६ ते ८ क्विंटल बियाणे लागवडीस पुरेसे असते.
2. बटाट्यावर येणाऱ्या रोगांचा विचार केला तर प्रामुख्याने उशिरा व लवकर येणारा अशा दोन प्रकारच्या करपा रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.
3. हा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर बेणे लागवडीच्या अगोदर कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात द्रावण घेऊन त्यामध्ये किमान ५ मिनिटे बेणे बुडवावे.
4. जर तुमचे वीस क्विंटल बेणे असेल तर त्याकरिता शंभर लिटरचे द्रावण पुरेसे ठरते.
5. तसेच बेण्याची वाढ चांगली व्हावी याकरिता IFC NPK जिवाणू ५०० ग्राम प्रति 100 लिटर पाणी अशाप्रकारे तयार द्रावणामध्ये बटाटे कमीत कमी अर्धा तास पर्यंत बुडवून ठेवावेत.

👉बेणे व लागवड पद्धत - बटाट्याची लागवड गादी वाफ्यावर करा. 2 ओळींमधील अंतर 2 फूट तर झाडांमधील अंतर 30 सें.मी किंवा 45 सें.मी ठेवा. ज्या बटाटा बेण्यावर डोळ्यांची संख्या असेल त्या बटाटा बेण्याची निवड करा.

👉खत व्यवस्थापन -
1. पूर्वमशागतीच्या वेळी एकरी १० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे पिकाला ४० किलो नत्र ३० किलो स्फुरद व ४० किलो पालाश प्रति एकरी देणे आवश्यक आहे.
2. या साठी युरिया ३० किलो, ५० किलो डीएपी आणि ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश + मायक्रोनुट्रीएंट खत १० किलो प्रति एकरी लागवडी वेळी खत द्या.
3. २५ दिवसांनी १०:२६:२६ - ५० किलो + युरिया २० किलो + मॅग्नेशियम सल्फेट ८ किलो प्रति एकरी द्यावे.

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम मराठी - https://bit.ly/3B9Ny8G
👉इंस्टाग्राम हिन्दी - https://bit.ly/45XAj88
👉वेबसाइट - https://krushidukan.bharatagri.com/
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

show more

Share/Embed